गाळ काढण्यासाठी कारखाने बंद

By Admin | Updated: May 3, 2017 05:16 IST2017-05-03T05:16:43+5:302017-05-03T05:16:43+5:30

तारापूर औद्योगिक वसाहतीमधून निर्मित होणाऱ्या सांडपाण्याचा दर्जा न सुधारल्यास राष्ट्रीय हरित लवाद आणि म. प्र. नियंत्रण मंडळाकडून

Closed factory to remove the mud | गाळ काढण्यासाठी कारखाने बंद

गाळ काढण्यासाठी कारखाने बंद

पंकज राऊत / बोईसर
तारापूर औद्योगिक वसाहतीमधून निर्मित होणाऱ्या सांडपाण्याचा दर्जा न सुधारल्यास राष्ट्रीय हरित लवाद आणि म. प्र. नियंत्रण मंडळाकडून तारापूर औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना कारवार्ईचा मोठा दणका बसण्याच्या भीतीने एमआयडीसी मधील सम्प नंबर तीन मध्ये वर्षोनुवर्षांपासून साठलेला रासायनिक घनकचरा (गाळ) काढणेचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. या करीता या सम्पला जोडलेले एल, एम आणि एन झोन मधील सुमारे २०० कारखाने सहा दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत.
तारापूर एमआयडीसी मध्ये एकूण चार सम्प सुमारे पंचवीस वर्षांपासून कार्यरत असून एल, एम आणि एन झोन मधील कारखान्यातील उत्पादन प्रक्रियेनंतर निघणारे रासायनिक सांडपाणी सम्प नं. 3 ला जोडले असून या सम्पची क्षमता पंधराशे क्यूबिक मीटर आहे,
प्रक्रिया केलेले सांडपाणी सम्प मधून टी. इ. पी. एस. ला पुढील प्रक्रियासाठी पाठविण्यात येत असते परंतु तारापूर एमआयडीसीतील सामुदायिक सांडपाणी प्रक्रि या केन्द्रामध्ये (सीईटीपी) सम्प व उद्योगा मधून येणाऱ्या सांडपाण्यामध्ये सीओडीची मात्रा अधिक असल्याने या प्रक्रिया केंद्रामध्ये सांडपाण्यावर अपेक्षित प्रक्रिया होत नसल्याने पर्यवरणावर गंभीर परिणाम होत आहे.
सम्प नं. ३ मध्ये मोठ्या प्रमाणात पंचवीस वर्षात घनकचरा (गाळ) साचला असून तो प्रथमच काढला जात असल्याने त्या मधे सुमारे तिनशे मेट्रिक टन रासायनिक घनकचरा (गाळ) असन्याची शक्यता वर्तवीण्यंत येते
या साचलेल्या गाळामुळे सांडपाण्यातील सी.ओ.डी.चे प्रमाण प्रचंड असून ते किती तरी पटीत जास्त येते त्या मुळे टी. इ .पी.एस. ला सांडपाण्यावर प्रक्रि या करण्यास खूप कठीण जात आहे. पर्यायाने पर्यावरणाच्या चौकटीतील (मापदंड) नियम काटेकोरपणे पाळले जात नाहीत टीमा आणि टी. इ. पी. एस. च्या माध्यमातून हा घनकचरा पोकलेनने काढण्यास शुक्रवारपासून सुरूवात झाली आहे.


गाळ निघाल्यास प्रक्रिया होणार प्रभावीपणे

सम्प न. ३ मधील घनचरा काढल्या नंतर जर सर्व कारखान्यांनी प्राथमिक प्रक्रि या करून सांडपाणी टी. इ. पी. एस. ला पाठविलयास सी. ओ. डी. चे प्रमाण कमी होईल, सम्प मध्ये घन कचरा मोठ्या प्रमाणात असल्याने सी ओ डी चे प्रमाण वाढते सम्प मधील घन कचरा काढल्या नंतर सी ओ डी च्या अतिरिक्त प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. आज पर्यंतच्या पाहणीत ऐन झोन मधून सम्पमध्ये येणाऱ्या सांडपाण्यात सी. ओ. डी. चे प्रमाण मर्यादे पेक्षा जास्त आहे. त्यामुळे रासायनिक सांड पाणी प्रक्रिया इतकेच सॉलीड वेस्ट सांडपाण्या बरोबर बाहेर पडणार नाही याची खबरदारी घेण्याची नितांत गरज आहे.

राष्ट्रीय हरित लवादाच्या दणक्या नंतर कारखानदारांना खऱ्या अर्थाने आणि खूप वर्षाने जाग आली असून गाळ काढण्याचा निर्णय टीमाने २६ एप्रिल रोजी आपातकालीन बोलविलेल्या बैठकीत घेणयांत आला होता. गाळ काढून त्या सम्प मध्ये फ्लोटींग एरिएटर बसविण्यात येणार असल्याने सम्प मध्ये गाळ (स्लज) तळाला साठणार नसून सॉल्व्हंट आणि आॅर्गेनिक गाळ वाहून जाण्यास मदत होणार आहे. सम्पमधील बहुसंख्य भाग घनकचऱ्याने व्यापल्याने त्या सम्प मधे येणाऱ्या सांडपाण्यावर पूर्ण क्षमतेने प्रक्रिया करताच येत नव्हती. त्याचा परिणाम सी ओ डी वर होत होता गाळ काढल्याने पूर्ण क्षमतेने प्रक्रिया होईल.

एमआयडीसीतील उर्वरीत सम्पचा गाळ लवकरच काढण्याचे काम हाती घेण्यात येणार असून त्यानंतर सम्पमध्ये ‘एरिएटर’ बसविण्यात येणार आहे त्यामुळे सीओडीमध्ये ३० टक्के घट होणे अपेक्षित आहे.
- डी.के. राऊत, अध्यक्ष, टीमा 

Web Title: Closed factory to remove the mud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.