मिरचीने शेतकऱ्याच्या जीवनात आणला गोडवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 00:43 IST2019-04-20T00:43:21+5:302019-04-20T00:43:28+5:30
भात कापणीनंतर जमिनीतील ओलावा दोन महिने टिकत असल्याने शेतकऱ्यांनी वाल, पावटे, हरभरा, तुर यांसारख्या पिकांची लागवड करण्यास सुरुवात केली आहे.

मिरचीने शेतकऱ्याच्या जीवनात आणला गोडवा
- राहुल वाडेकर
विक्रमगड : भात कापणीनंतर जमिनीतील ओलावा दोन महिने टिकत असल्याने शेतकऱ्यांनी वाल, पावटे, हरभरा, तुर यांसारख्या पिकांची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. त्यात भर म्हणजे रब्बी हंगामात तालुक्यात भाजीपाला लागवड मोठया प्रमाणात होऊ लागले असुन काही शेतकरी यातुन लाखो रु पये कमवत आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतीचे अर्थकारण बदलण्यास सुरु वात झाली आहे.
तालुक्यातील मलवाडा गाव पिंजाळ नदी काठी वसले असुन पाण्याची उपलब्धता असतानाही पडिक जागेचे प्रमाण अधिक आहे. असे असताना मलवाडा गावातील प्रयोगशील शेतकरी कमलाकर सदाशिव भोईर यानी आपल्या डोंगराच्या उताराला असलेल्या पडीक जागेत एक एकर मध्ये पहिल्यादाच मिरची पिकाची लागवड करुन लाखो रु पये उत्पन्न मिळवले आहे.
कष्टाला तंत्रज्ञानाची साथ दिल्यास अल्प क्षेत्रातदेखील जास्तीत- जास्त उत्पन्न घेता येऊ शकते येथील शेतकरी कमलाकर सदाशिव भोईर यांनी करून दाखिवला आहे.
त्यांनी आपल्या मध्यम प्रतीच्या एक एकर क्षेत्रात मिरची या पिकाच्या ‘इंदु’ या वाणाच्या तिखट मिरचीची लागवड केली आहे. यामध्ये त्यांना एक एकर साठी १० पैकेट (१ किलो) बियाणे लागले. औषधे, खते (सेंद्रिय), बी, मजुरी याचा एकुण ४५ हजार खर्च आला. उन्हाळा असल्या कारणाने दोन दिवसातुन एकदा पाणी द्यावे लागते. तर दीड महिन्यांच्या कालावधी नंतर मिरचीचे उत्पन्न सुरु झाले. एक आठवड्यातुन ते तोडा करत असुन एक टन मिरचीचे उत्पन्न मिळत आहे.
>सेंद्रिय पद्धतीने मिरची पिकाची लागवड
साधारण अडिच महिन्यापूर्वी मध्यम प्रतीच्या एक एकर जमिनीत वाफे पद्धतीने मिरचीच्या रोपांची लागवड करून पाण्याचे नियोजन केले आहे. नियमित आणि आवश्यक तितकेच पाणी दिल्याने रोपांच्या मुळ्या जमिनीत व्यविस्थत स्थिर होऊन पीक जोमात वाढले. अडिच महिन्याच्या कालखंडात रोगमुक्त औषधांचा मात्रा दिल्याने पिकाची रोगराईपासून मुक्ती होण्यास मदत झाली. त्यातच कंपोस्ट आणि शेणखताचा अधिक वापर केल्याने झाडाला रोगमुक्त फुले आली.
>या वर्षी दुष्काळा ची तीव्रता जास्त असल्याने तोडीव पिकांच्या लागवडी उत्पादकांना करता न आल्याने मालाचा तुटवडा निर्माण होऊन बाजारभाव या वर्षी तेजीत राहिले. त्याचा फायदा आम्हाला या वर्षी झाला आहे.
- कमलाकर भोईर, मिरची उत्पादक शेतकरी, मलवाडा गाव