मिरचीचा भाव कमी; शेतकरी तोट्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:08 IST2018-05-29T00:08:39+5:302018-05-29T00:08:39+5:30
शहापूर तालुक्यातील सारमाळ येथील एक शेतकरी आपल्या पाच एकर शेतीत नानाविध भाज्यांसोबतच मिरचीचे उत्पन्न घेत आहे.

मिरचीचा भाव कमी; शेतकरी तोट्यात
भातसानगर : शहापूर तालुक्यातील सारमाळ येथील एक शेतकरी आपल्या पाच एकर शेतीत नानाविध भाज्यांसोबतच मिरचीचे उत्पन्न घेत आहे. यंदा वेगळ्या पद्धतीचे मिरचीचे उत्पन्न घेतले, मात्र, भाव अचानक उतरल्याने त्याचे नुकसान झाले. त्यामुळे मिरची तोडून टाकण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.
सारमाळ येथील शेतकरी मंगेश फाल्गुन पाटील यांनी आपल्या सिमला मिरची लावली. याच्या एकूण उत्पन्नामधून त्यांनी दोन लाखांचा नफा मिळवला. तर, दीड एकर जागेत लावलेल्या कारल्यामधूनही त्यांना तीन लाखांचा नफा मिळाला.
यंदा शेतकऱ्यांनी कारली, सिमला मिरची तसेच दुसºया जातीच्या मिरचीकडे वळला. कारली व सिमलाने तारले, पण मिरचीने मारले, असेच म्हणण्याची वेळ आली आहे.