शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

खराब हवामानामुळे चिकूचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 01:09 IST

शासनाने सर्वेक्षण करण्याची मागणी; बागायतदारांसह शेतकरी मेटाकुटीला

डहाणू : खरीप हंगामाने पालघर तसेच ठाणे जिल्ह्यातील सर्व पिकांची वाताहत केली असून त्यामध्ये चिकूचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे फळगळ झालेल्या चिकू बागांना यापुढचे तब्बल २० ते २४ महिने चिकूफळ लागण्याची शाश्वती नाही. ओस पडलेल्या या चिकू बागांमुळे चिकू कामावर अवलंबून मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर अतिवृष्टीमुळे भातशेतीला लागलेली कणसे गळू लागल्याने जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.पालघर जिल्ह्यातील घोलवड, बोर्डी कंक्राटी, वाणगाव डहाणू या भागात चिकूच्या बागा गेल्या १२५ ते १३० वर्षांपासून विकसित केल्या आहेत. १९८५ - ८६ पासून फलोद्यान योजनांमध्ये चिकू, आंबा, नारळ बागा मोठ्या प्रमाणात विकसित झाल्या असून गरीब आदिवासी समाजाने देखील बागा विकसित केल्या आहेत. परंतु या खरीपातील अतिवृष्टीमुळे चिकू बागांचे आणि भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शासनाने ताबडतोब सर्वेक्षण करून प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी २ लाख रुपयांची मदत मिळवून देण्याची बागायदारांची मागणी आहे. विशेषकरून येथील चिकू फळाला दिल्ली, काश्मीर भागात जास्त मागणी असून ही सर्व फळे रस्ते वाहतुकीने पाठविली जातात. चार वर्षांपासून रेल्वे भाड्यात खूप वाढ केली आहे. ही फळे वाहतूक रेल्वेमार्फत फळे स्वस्त दरात ग्राहकांना मिळतील आणि चिकू उत्पादकाला वाहतुकीपोटी कमी खर्च येईल, असे येथील चिकू बागायतदारांचे म्हणणे आहे.चिकू संशोधन केंद्र उभारण्याचे काय झाले?पालघर जिल्ह्यामध्ये बारा हजार हेक्टरमध्ये चिकू बागा विकसित झाल्या असून चिकू बागांवर उद्भवणाºया बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. पुणे जिल्ह्यातील मांजरी येथे द्राक्षाचे राष्ट्रीय संशोधन केंद्र, डाळींबाचे राष्ट्रीय संशोधन केंद्र सोलापूर येथे आहे. त्याच धर्तीवर डहाणू, घोलवड परिसरात चिकूचे राष्टÑीयसंशोधन केंद्राची मागणी २००७ पासून प्रलंबित आहे.राष्ट्रीय चिकू संशोधन केंद्र, डहाणू - कोसबाड येथे उभारण्याची बागायतदारांची मागणी आहे. २० ते २५ वर्षांपूर्वी या भागातील चिकूचे उत्पन्न प्रतिझाड प्रति वर्ष २५० ते ३०० किलो होते. ते आता जेमतेम १०० ते १२५ किलो प्रतिझाड आहे.नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्रामार्फत या भागातील हवा आणि पाणी (पर्यावरणाचा) अभ्यास होणे खूप गरजेचे आहे. स्थानिक रेल्वे स्टेशन डहाणू, पालघर, उंबरगांव, वापी, वलसाड स्टेशनवर चिकू विक्री केंद्रे तसेच स्थानिक उत्पादीत पदार्थ विक्री केंद्र शेतकऱ्यांना रेल्वे स्थानकात उपलब्ध करून दिल्यास या भागातील शेतकºयांची आर्थिक क्र यशक्ती वाढण्यासाठी फार मोठी मदत होईल.- विनायक बारी, महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाचे अध्यक्ष