डहाणूत सराईत दरोडेखोरांना बेड्या

By Admin | Updated: March 28, 2017 04:52 IST2017-03-28T04:52:29+5:302017-03-28T04:52:29+5:30

जागरु क नागरिकांच्या सतर्कतेमुळे केवळ चार तासात कुप्रसिद्ध रवी पुजारी आणि छोटा राजन गँगच्या दोन दरोडेखोरांना

Charges for the trail-laden robbers | डहाणूत सराईत दरोडेखोरांना बेड्या

डहाणूत सराईत दरोडेखोरांना बेड्या

डहाणू: जागरु क नागरिकांच्या सतर्कतेमुळे केवळ चार तासात कुप्रसिद्ध रवी पुजारी आणि छोटा राजन गँगच्या दोन दरोडेखोरांना बेड्या ठोकण्यात शनिवारी डहाणू पोलिसांना यश आले आहे.
दीपक गौंड (३८) रा.कांदिवली, संजय सहाने (३७) रा. नालासोपारा असे या दरोडेखोरांचे नाव असून ते दारूच्या नशेत मोटर सायकल घेऊन डहाणूच्या दिशेने येऊन रामवाडी येथील घरात घरफोडी करु न बार मध्ये दारु पित होते. त्यांना पोलिस उपनिरिक्षक विजय गोडसे व त्याच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांनी नालासोपारा, मुंबई येथे असंख्य दरोडे, खून केल्याचे कबूल केले. २००२ पासून गौड हा अनेकवेळा तुरूगांत गेला होता. त्याची नुकतीच सुटका झाली होती. त्यांना अटक करण्यात आली तेव्हा रोख रक्कम, कटावनी, स्क्रू ड्रायव्हर, पकड हस्तगत केले. त्यांना २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, डहाणू चर्चेगेट रेल्वे सेवा सुरु झाल्यापासून डहाणूत दरोड्याचे प्रमाण वाढले आहे. यांच्या अटकेमुळे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)

Web Title: Charges for the trail-laden robbers