दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 18:07 IST2018-07-07T18:06:10+5:302018-07-07T18:07:17+5:30
कर्नाटकात खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या रामदिनला अटक

दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला बेड्या
वसई – वसईतील माणिकपूर पोलीस ठाणे हद्दीत आपली खरी ओळख लपवून राहात असलेल्या कर्नाटक राज्यातील बंगळुरू शहरातील एका खुनाच्या फरार आरोपीला जेरबंद करण्यात माणिकपूर पोलिसांना यश आले आहे. धक्कादायक म्हणजे हा आरोपी चक्क दोन वर्षांपासून बंगळुरू शहरात त्याने केलेल्या एका खुनाच्या प्रकरणातील मुख्य आरोपी असून तो वसईत नवघर पूर्वेला आपली खरी ओळख लपवून राहात होता.
रामदिन सीताराम राम (वय - ३९) हे या या फरार आरोपीचे नाव असून त्याच्यावर कर्नाटक राज्यातील बंगळुरू शहर पोलीस विभागातील करडू गोल्डन हल्ली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.