परफ्युमच्या बाटल्यांवर एक्सपायरी डेट बदलणे पडले महागात; फ्लॅटमध्ये झाला मोठा स्फोट, चार जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 12:49 IST2025-01-10T12:48:04+5:302025-01-10T12:49:09+5:30
पालघरमध्ये आज परफ्युमच्या बाटल्यांवरील एक्सपायरी तारीख बदलणे महागात पडले आहे. बाटल्यांचा मोठा स्फोट झाला आहे.

परफ्युमच्या बाटल्यांवर एक्सपायरी डेट बदलणे पडले महागात; फ्लॅटमध्ये झाला मोठा स्फोट, चार जण जखमी
पालघरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. एक फ्लॅटमध्ये अचानक मोठा स्फोट झाला, या घटनेत एकाच परिवारातील चार जण जखमी झाले आहेत. परफ्युमच्या बाटल्यांवरील एक्सपायरी डेट बदलत असताना हा स्फोट झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट गुरुवारी रात्री उशीरा झाला.
महावीर वडर (४१), सुनीता वडर (३८), कुमार हर्षवर्धन वडर (९) आणि कुमारी हर्षदा वडर (१४) हे या घटनेत जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, परफ्यूमच्या बाटल्यांवरील एक्सपायरी डेट बदलण्याच्या प्रयत्नादरम्यान हा स्फोट झाला, या बाटल्यांमध्ये ज्वलनशील पदार्थ असतात. कुमार हर्षवर्धन यांच्यावर नाला सोपारा येथील लाईफ केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर इतरांवर त्याच भागातील ऑस्कर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.