शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

शिवसेनेपुढे विरोधकांसह बंडखोराचेही आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 23:46 IST

नगराध्यक्षाच्या पदासाठी शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षा अंजली पाटील यांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्याचा घेतलेला निर्णय हा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान ठरले आहे.

पालघर : नगराध्यक्षाच्या पदासाठी शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षा अंजली पाटील यांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्याचा घेतलेला निर्णय हा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान ठरले आहे. इथे सेनेच्या अधिकृत उमेदवाराला सेनेच्या बंडखोर उमेदवारा बरोबरीनेच काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन आघाडीच्या उमेदवारांचाही सामना करावा लागणार आहे.नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी पक्षाचे तिकीट न दिलेल्या शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांनी आपले बंडखोरी मागे घेऊन उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे एकनाथ शिंदे आणि संपर्क प्रमुख, आमदार रवींद्र फाटक यांचे आवाहन बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी पायदळी तुडवले. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार डॉ. श्वेता मकरंद पाटील, आघाडी कडून डॉ. उज्वला काळे यांच्या बरोबर अपक्ष अंजली पाटील यां तिघांमध्ये नगराध्यक्षपदा साठी लढत रंगणार आहे. माजी नगराध्यक्ष अंजली पाटील यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी नाकारल्याने नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष म्हणून त्या रिंगणात उतरल्या नंतर नगरसेवक व प्रमुख कार्यकर्त्यांनाही उमेदवारी नाकारली गेली असून अशा शिवसैनिकांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेतील बंडखोरांच्या पक्षांचे पॅनल शिवाजी महाराजांच्या नावाने समोर येत हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे अनेक प्रभागात शिवसेना अधिकृत विरु द्ध शिवसेना बंडखोर व आघाडी असा तिरंगी सामना पहावयास मिळणार आहे. पालघर नगर परिषदेच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणातील बंडखोरी प्रथमच पहावयास मिळत आहे.पालघर नगर परिषदेसाठी ७२ उमेदवार रिंगणातनगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी ११ पैकी ८ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने ३ उमेदवारांमध्ये सरळ लढत होणार आहे. तर नगरसेवक पदासाठी ११३ उमेदवारांपैकी ४० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.यातील प्रभाग क्र मांक 6 अ मध्ये एका अपक्ष उमेदवारांनी आपलं अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेचे कैलास म्हात्रे हे बिनविरोध निवडून आले आहेत. तर प्रभाग ६ ब मध्ये उमेदवारीच्या अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला आव्हान दिल्याने या प्रभागातील स्थिती न्यायालयाच्या निर्णया नंतरच स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :palgharपालघरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक