मीरा भाईंदरमधील कोरोना संसर्ग व उपाययोजनांचा केंद्रीय पथकाने घेतला आढावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 10:11 PM2021-04-11T22:11:08+5:302021-04-11T22:11:08+5:30

केंद्र शासनाच्या पथकाने सुरवातीला महापालिका मुख्यालयात पालिका आयुक्त दिलीप ढोले व संबंधित अधिकाऱ्यां सोबत चर्चा केली .

Central team reviews corona infection and remedies in Mira Bhayandar | मीरा भाईंदरमधील कोरोना संसर्ग व उपाययोजनांचा केंद्रीय पथकाने घेतला आढावा 

मीरा भाईंदरमधील कोरोना संसर्ग व उपाययोजनांचा केंद्रीय पथकाने घेतला आढावा 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर मधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या, प्रादुर्भाव कमी करण्यासाठीच्या सूचना आणि महापालिकेने त्यावर केलेल्या उपाययोजना आदींचा आढावा घेण्यासाठी केंद्राचे पथक रविवारी आले होते . यावेळी पालिका अधिकाऱ्यांना त्यांनी काही सूचना व मार्गदर्शन केले . 

 

केंद्र शासनाच्या पथकाने सुरवातीला महापालिका मुख्यालयात पालिका आयुक्त दिलीप ढोले व संबंधित अधिकाऱ्यां सोबत चर्चा केली . यावेळी महापालिकेने कोरोनाचा प्रार्दुभाव कमी करण्यासाठी प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या विविध उपाय योजना व माहिती सादर केली . नंतर पथकाने पालिकेच्या पंडित भिमसेन जोशी कोविड रुग्णालयास भेट दिली. तेथील आयसीयू खाटा , ऑक्सीजन पुरवठा, उपलब्ध खाटांची संख्या, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा व तिथल्या यंत्रणेची पाहणी करून माहिती घेतली . 

 

त्याठिकाणी सुरु असलेल्या कोविड लसीकरणची माहिती घेत लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला . त्या ऐकून पथकाने पालिका अधिकाऱ्यांना तसेच नागरिकांना सुद्धा काही सूचना केल्या . मीरारोड येथील गार्डन कोर्ट ह्या कंटेनमेंट झोन भागाची पथकाने पाहणी केली . उपस्थित नागरिकांशी त्यांनी चर्चा केली . 

 

घोडबंदर येथील कोविड लॅब सेंटरला भेट देऊन तेथील कामाची पाहणी केली . यावेळी टेस्टींगच्या सुविधा तसेच लसीकरणाची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले. गोल्डन नेस्ट येथील उपचार केंद्रावर दिल्या जाणाऱ्या व्यवस्थेची पथकाने पाहणी केली .  महानगरपालिकेचे उपायुक्त संभाजी वाघमारे व वैद्यकीय आरोग्य विभागीतील अधिकारी पथका सोबत उपस्थित होते.

Web Title: Central team reviews corona infection and remedies in Mira Bhayandar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.