अवैध रेतीच्या चार गाड्या पकडल्या

By Admin | Updated: August 11, 2015 23:41 IST2015-08-11T23:41:28+5:302015-08-11T23:41:28+5:30

तलासरी पोलीसांनी सोमवारी रात्री गस्त घालताना बंदी असलेल्या रेतीची वाहतूक करत असलेल्या चार रेतीच्या गाड्या पकडून दंडात्मक कारवाईसाठी तलासरी तहसिलदारांच्या ताब्यात दिल्या.

Capture four carts of illegal sand | अवैध रेतीच्या चार गाड्या पकडल्या

अवैध रेतीच्या चार गाड्या पकडल्या

तलासरी : तलासरी पोलीसांनी सोमवारी रात्री गस्त घालताना बंदी असलेल्या रेतीची वाहतूक करत असलेल्या चार रेतीच्या गाड्या पकडून दंडात्मक कारवाईसाठी तलासरी तहसिलदारांच्या ताब्यात दिल्या. यावेळी मंडळ अधिकारी यांनी या गाड्याचा पंचनामा करून प्रत्येकी १ लाख ९९ हजार ६०० प्रमाणे दंडात्मक कारवाई केली.
तलासरी महसूल विभाग व तलासरी पोलीस यांच्याकडून नियमीत अवैधरेती वाहतुक करणाऱ्या रेती माफीयाच्या गाड्यावर कारवाई करण्यात येते. तरी सुद्धा रेतीमाफीया पुन्हा पुन्हा अवैध रेती व्यवसायात आपल्या गाड्या आणत असल्याने रेती माफीयावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेने केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Capture four carts of illegal sand