Canned iron also cooled due to readymade materials | रेडिमेड साहित्यामुळे लोहाराचा भाताही थंडावला

रेडिमेड साहित्यामुळे लोहाराचा भाताही थंडावला

- सुनील घरत 

पारोळ : शेतीच्या कामात आज रेडिमेड साहित्य तसेच यांत्रिक अवजारांचा वापर केला जात असल्याने लोहार, आणि सुतार, व्यवसायाला घरघर लागली असून त्यांना काम मिळत नसल्याने समाजातील तरु ण इतर व्यवसायाकडे वळला आहे.

कधीकाळी शेतकऱ्यांचा आवश्यक घटक म्हणून समजल्या जाणाºया लोहार - सुतार समाजावर अलीकडच्या काळात आर्थिक संकट कोसळले आहे. शेती व्यवसायात आलेल्या अत्याधुनिक साहित्यामुळे या समाजाला उपजीविका चालविणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांची शेतीकरिता उपयोगी असलेली अवजारे ही लाकडी असल्यामुळे शेतकºयांच्या दैनंदिन अवजारे बनविण्याकरिता सुतारांसोबत संबंध यायचा.

लोखंडी अवजारे बनवण्यासाठी आपल्या छोट्याशा दुकानात चामडी भाता आणि भाता ओढण्यासाठी घरातील महिला किंवा मुलांचे सहकार्य घेत होते. दुकानामध्ये ऐरण, घन, वासला, आरी, किकरा पटास, कानस, सांडशी घेऊन लोहार आपले व्यवसाय करीत होते. व या व्यवसायावरच लोहार-सुतार समाजाच्या पूर्ण कुटुंबाच्या उदरिनवार्हाची जबाबदारी होती. मात्र, यांत्रिक युगामध्ये लोहाराच्या धंद्याला अवकळा आली असून त्यांचा धंदा पावसाळ्यापुरताच मर्यादित राहिला आहे.

पावसाळ्यात शेतकºयांना शेतीची अवजारे, वखराचा लोखंडी विळे, कुºहाड, कुदळ, विळे पाजविणे एवढेच मर्यादित राहिल्याने तसेच बाजारामध्ये शेतकºयांची सर्व अवजारे रेडीमेड मिळत असल्यामुळे लोहाराचा मुख्य धंदा बंद होण्याच्या मार्गावर आहे.
आता यांत्रिक युगामध्ये शेतकºयांची बैलगाडी हद्दपार होण्याच्या मार्गावर असून ट्रॅक्टर, पावर ट्रिलर, लोखंडी बंडीसारखे यंत्र निघाल्यामुळे सुताराचा लाकडी औजारे बनविण्याचा व्यवसाय बंद होत आहे.

पूर्वीच्या काळी शेती अवजारे जास्तीत जास्त लाकडी रहायची आणि ती गावातीलच लोहार-सुताराकडून शेतकरी करून घ्यायचे. त्यात शेतकºयांचे मुख्य शेतीकरिता लागणारे वाहन म्हणजे लाकडी बैलगाडी, शेतकºयांची बैलगाडी तयार करण्याकरिता सुताराला जवळपास एक महिन्याचा कालावधी लागायचा. बैलगाडीकरीता दोन सागवान किंवा तिवसाच्या झाडाचे धुरे, लाकडी तक्त्यांचा फळ, जुवाडी, खुटाडे, धुरी, मांडगे, हरणी, करवई, खोबन आणि त्यामध्ये लोखंडी आख. आखेमध्ये दोन चाके घालून लाकडी बैलगाडी करायची. बंडी तयार करण्यासाठी लोहाराला एक महिना मेहनत करावी लागत होती. मात्र, या मेहनतीसाठी लोहाराला शेतकºयांकडून चांगली मिळकत व्हायची.

लोहार काम कमी झाल्याने आमच्या समाजावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे महागाईच्या दिवसात मुलांचे शिक्षण, घरचा खर्च चालवणे कठीण झाले आहे. शेतीचे नुकसान म्हणजे आमचा धंदा कमी, हे गणित असल्याने शेतकरी नुकसानभरपाईसोबत आमचाही विचार सरकारने करावा.
- सतीश सोमवंशी, अध्यक्ष, वसई तालुका लोहार समाज

Web Title: Canned iron also cooled due to readymade materials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.