शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

प्रचार थंडावला, प्रशासन सज्ज; वसई-विरार महापालिकेसाठी ८ हजार ६०० कर्मचारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 10:58 IST

३ हजार ७१३ पोलिसांची कुमक

लोकमत न्यूज नेटवर्क,  नालासोपारा: वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकांसाठी गेल्या १०-१२ दिवसांपासून सुरू असलेला प्रचार मंगळवारी सायंकाळी बंद झाला. आता उत्सुकता आहे ती मतदान आणि निकालाची. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी वसई-विरार महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. वसई-विरारमध्ये ११५ जागांसाठी मतदान होत असून १३५५ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी ८ हजार ६०० कर्मचारी सर्वच ठिकाणी तैनात केलेले असून, शहरात पोलिसांचाही कडक बंदोबस्त राहणार आहे.

मागील काही दिवसांपासून वसई-विरारमध्ये धडाडत असलेल्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा मंगळवारी संध्याकाळी थंडावल्या. निवडणुकीच्या दृष्टीने प्रशासकीय कामांची लगबग गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरूच आहे. आता मतदान आणि मतमोजणीच्या दृष्टीने प्रशासन सज्ज झाले आहे. २९ प्रभागांतून मिळून ५४७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ३१७ सेंटर असून १३५५ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानासाठी १५०० कंट्रोल युनिट आणि ४ हजार ३०० बॅलेट युनिट असणार आहे. प्रत्येक प्रभागानुसार नऊ स्ट्राँग रूम तर मुख्य एक स्ट्रांग रूम वसई-विरार महापालिकेच्या मुख्यालयात असणार आहे. या होणार आहे. ठिकाणी १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. यामध्ये ५० सीटच्या ८४ बस, ३५ सीटच्या १६४ बस, २० सीटच्या २६ बस आणि १७सीटच्या १० बस अशा एकूण २८४ खासगी बस असणार आहेत. तसेच १३२ झोनल अधिकाऱ्यांसाठी १३२ चारचाकी वाहने आणि दिव्यांगांसाठी १२ वाहने असणार आहेत.

मतदान केंद्रांवरील सुविधा

पिण्याचे पाणी, प्रतीक्षागृह, शेड, स्वच्छतागृहे, पुरेशी प्रकाश व्यवस्था, दिव्यांग मतदारांसाठी योग्य उताराचा रॅम्प व व्हीलचेअर, मानक मतदान कक्ष, आवश्यक दिशादर्शक फलक अशी व्यवस्था मतदान केंद्रांवर असणार आहे. दिव्यांग मतदार, गर्भवती महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना मतदान कक्षात प्रवेशदेताना प्राधान्य देण्यात येणार आहे.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिमंडळ २ व परिमंडळ ३ यांमध्ये तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. २ पोलिस उपायुक्त, ५ सहायक पोलिस आयुक्त, २३ पोलिस निरीक्षक, १३१ पोलिस अधिकारी, १ हजार ८८६ पोलिस अंमलदार, १ हजार ३६६ होमगार्ड, १२० मसुब, २ एसआरपीएफचे २ प्लाटून आणि ७६ पोलिसांचे सेक्टर पेट्रोलिंग असणार आहे.

प्रभागात एक सखी केंद्र

मतदारांच्या रांगांचे व्यवस्थापन, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना मतदानासाठी महापालिकेचे कर्मचारी मदत करणार आहेत. निवडणुकीसाठी आठ हजार तसेच सर्व प्रक्रिया राबविणारे ६०० असे एकूण ८ हजार ६०० अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागात किमान एक गुलाबी सखी मतदान केंद्र उपलब्ध असणार असून, तेथील सर्व व्यवस्था महिला कर्मचारी पाहतील. 

English
हिंदी सारांश
Web Title : Vasai-Virar Municipal Elections: Campaigning Ends, Administration Ready with 8,600 Staff

Web Summary : Vasai-Virar Municipal Corporation elections see campaigning conclude. Voting on January 15th. 8,600 staff deployed across 1,355 polling centers with tight police security. The counting will be on January 16th. Facilities are available at polling booths for voters.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Municipal Corporationनगर पालिकाVasai Virar Municipal Corporation Electionवसई विरार महानगरपालिका निवडणूक २०२६Vasai Virarवसई विरारPoliticsराजकारण