बुलेट ट्रेन आणि बडोदा एक्स्प्रेस-वे रद्द करू -नीलम गो-हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 01:16 IST2018-07-01T01:16:07+5:302018-07-01T01:16:17+5:30
बुलेट ट्रेन आणि बडोदा एक्स्प्रेस-वे रद्द केल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी प्रकल्पबधितांना दिली. शिवसेनेच्या जनसंपर्कदौऱ्याला तलासरीतील कवाडा गावातून सुरुवात झाली. त्या वेळी त्या बोलत होत्या.

बुलेट ट्रेन आणि बडोदा एक्स्प्रेस-वे रद्द करू -नीलम गो-हे
पालघर/तलासरी : बुलेट ट्रेन आणि बडोदा एक्स्प्रेस-वे रद्द केल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी प्रकल्पबधितांना दिली. शिवसेनेच्या जनसंपर्कदौऱ्याला तलासरीतील कवाडा गावातून सुरुवात झाली. त्या वेळी त्या बोलत होत्या.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीदरम्यान बुलेट ट्रेन आणि बडोदा एक्स्प्रेस-वेला विरोध दर्शविला होता. हा विरोध अधिक तीव्र करण्यासाठी गावागावांत जाऊन ग्रामपंचायतींचे विरोधाचे ठराव घ्या, असे आदेश त्यांनी शिवसेना पदाधिका-यांना दिले होते. त्यानुसार शनिवारी बुलेट ट्रेन, बडोदा एक्स्प्रेस हायवेविरोधात शिवसेनेच्या जनसंपर्कदौºयाला तलासरी (कवाडा) येथून सुरु वात झाली. पुढे डहाणू तालुक्यात आंबेसरी, वनई, पालघर तालुक्यात नंडोरे, विराथन आदी भागांत हे दौरे आयोजित करण्यात आले होते. या वेळी स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या व्यथा गोºहे यांच्या समोर मांडल्या.
बुलेट ट्रेन, बडोदा एक्स्प्रेस-वे या दोन्ही प्रकल्पांमध्ये आमच्या सुपीक जमिनी जाणार असल्याने आम्ही उद्ध्वस्त होणार आहोत. याआधी दापचरी प्रकल्प (१९६०), सूर्या प्रकल्प (१९८२) अशा विविध विकास प्रकल्पांत ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांचे अजूनही पुनर्वसन झालेले नसल्याचे वास्तव या वेळी मांडण्यात आले. प्रकल्प आणताना स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात न घेणे, हा प्रकल्प रेटताना दैनंदिन रेल्वे प्रवास सुरक्षित आणि सुखकर करणे, गावात प्यायला पाणी देणे, रस्त्यांची दुर्दशा, रोजगार आदी प्रमुख समस्यांकडे प्रशासनातर्फे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. तसेच कवाला, आंबेसरी, धामणगाव, वणई, साखरे, दाभळे या ग्रामपंचायतींमध्ये मंजूर करण्यात आलेले प्रकल्पविरोधी ठराव या वेळी सादर करण्यात आले.
या वेळी शिवसेनेचे पालघर संपर्कप्रमुख आ. रवींद्र फाटक यांनी तुम्हाला शिवसेनेचा १०० टक्के पाठिंबा असेल आणि तुमच्या
न्याय हक्कासाठी शिवसेना कायम प्रयत्न करेल, असे सांगितले. या वेळी खा. विनायक राऊत, आ. अमित घोडा, पालघर लोकसभा
संघटक श्रीनिवास वनगा, कवाडा ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी शंकर छडा, विजय गोदळे, रमण खरपडे, सरपंच लता कातेला, उपसरपंच संजना पोकरे, तर आंबेसरी गावातील शेतकरी संदीप धामण, रामचंद्र सलाट, विजय नांगरे, सरपंच छोटू हालडे, जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, जिल्हाप्रमुख केतन पाटील, जिल्हाप्रमुख राजेश शहा, माजी जिल्हाप्रमुख उदय पाटील, विधानसभा संघटक पालघर वैभव संखे, ज्योती मेहेर, शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
तुम्हीही लक्ष ठेवा...
आ. नीलम गोºहे म्हणाल्या, १६ मे रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलेट ट्रेनविरोधात भूमिका घेतली आहे. ती भूमिका कायम राहील, तसेच तुमच्या जमिनींबाबत सरकारी अधिकाºयांकडून चुकीची कागदपत्रे रंगवली जात नाही ना याकडे तुम्हीही लक्ष ठेवा. कागदपत्रे वाचल्याशिवाय कुठेही स्वाक्षरी करू नका, मोजणी थांबवा, असे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले. येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये या दोन्ही मुद्द्यांवर आवाज उठवू, असे आश्वासन त्यांनी दिले.