बीएसएनएलच्या खेळखंडोब्याने वाड्यातील बॅँकेचे व्यवहार ठप्प
By Admin | Updated: March 25, 2017 00:59 IST2017-03-25T00:59:35+5:302017-03-25T00:59:35+5:30
कुडूस येथील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत बीएसएनएलचे नेटवर्किंग आहे. मात्र गुरूवार पासून नेट खंडीत झाल्याने सर्व

बीएसएनएलच्या खेळखंडोब्याने वाड्यातील बॅँकेचे व्यवहार ठप्प
वाडा : कुडूस येथील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत बीएसएनएलचे नेटवर्किंग आहे. मात्र गुरूवार पासून नेट खंडीत झाल्याने सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत.
येथील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेमध्ये परिसरातील शेकडो शेतकरी, नोकरदार, व्यापारी व कंपन्यांनी आपली खाती उघडली आहेत. सरकारी योजनांचे लाभ जिल्हा बॅँके तून मिळत असल्याने ती गोरगरीबांना जवळची वाटते. शुक्र वार आठवडा बाजार असल्याने गाठीला असलेले पैसे खरेदीसाठी काढण्याच्या उद्देशाने आलेल्या शेकडो खातेदारांना रिकाम्या हाती परतावे लागले. तर अन्य कामानिमित्त लागणारे पासबुक प्रिन्ट, आर्थिक व्यवहारातील कागदपत्रांच्या प्रति नेट बंद असल्याने सोमवारपर्यंत वाट पाहवी लागणार आहे. (वार्ताहर)