दोघांच्या भांडणात गेला तिसऱ्याचा जीव

By Admin | Updated: July 20, 2015 03:07 IST2015-07-20T03:07:22+5:302015-07-20T03:07:22+5:30

नालासोपारा पूर्व येथील रेहमननगरमध्ये अरुष सिंह (२०) याला सजिद नावाच्या तरुणाने तलवारीने वार करून गंभीर जखमी केले. त्याला उपचारासाठी महानगरपालिकेच्या रुग्णालयात

Both of them went into a quarrel with the third creature | दोघांच्या भांडणात गेला तिसऱ्याचा जीव

दोघांच्या भांडणात गेला तिसऱ्याचा जीव

पारोळ : नालासोपारा पूर्व येथील रेहमननगरमध्ये अरुष सिंह (२०) याला सजिद नावाच्या तरुणाने तलवारीने वार करून गंभीर जखमी केले. त्याला उपचारासाठी महानगरपालिकेच्या रुग्णालयात नेले असता जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्याला मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, वार करून आरोपी फरार झाला असून तुळींज पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही घटना शनिवारी रात्री ११ वाजता घडली.
दोन जणांचा भांडण सुरू असताना अरुष हा ते सोडविण्यासाठी गेला होता. मात्र साजीद नावाच्या तरुणाने त्याच्यावर तलवारीने हल्ला करून जबर जखमी केले. या घटनेची नोंद तुळींज पोलिसात झाली असून आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नालासोपारा पूर्व भागात गुन्हेगारीच्या वाढत्या घटना पाहता या भागातील नागरिकांना सुरक्षेचा प्रश्न सतावीत असून याकामी तुळींज पोलीस ठाण्याची नव्याने निर्मिती झाली असतानाही या भागात गुन्हेगारांना आळा बसत नसल्याचे या भागातील नागरिकांचे मत आहे. (वार्ताहर)

Web Title: Both of them went into a quarrel with the third creature