हत्येचे गूढ उकलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 06:17 IST2018-03-14T06:17:08+5:302018-03-14T06:17:08+5:30

पैशाच्या वादातून एकाची हत्या करून मृतदेह हायवेवर टाकून दिलेल्या दोघांना विरार पोलिसांनी अटक केली आहे.

Boil the mystery of the murder | हत्येचे गूढ उकलले

हत्येचे गूढ उकलले

विरार : पैशाच्या वादातून एकाची हत्या करून मृतदेह हायवेवर टाकून दिलेल्या दोघांना विरार पोलिसांनी अटक केली आहे.
२८ फेब्रुवारीला विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-अहमदाबाद हायवेलगत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव यांच्या पथकाने तपासाअंती दोन मारेकºयांना अटक केली. आरोपींनी ओला टॅक्सी खरेदी करण्यासाठी मृत इसमाला रोख रक्कम दिली होती. मात्र, मृत इसम पैसे मिळाल्यानंतर टॅक्सी देण्यास टाळाटाळ करू लागला होता. घेतलेले पैसेही परत करीत नव्हता. त्यामुळे संतापलेल्या आरोपींनी त्याचा गोड बोलून त्याला हायवेवर कोपर गावाजवळ बोलाविले. त्यानंतर त्याची गळा आवळून हत्या करून मृतदेह हायवेकडेला फेकून पळ काढला.

Web Title: Boil the mystery of the murder