कारमध्ये बांधलेल्या अवस्थेत सापडला, हत्या केलेला वयोवृद्धाचा मृतदेह; पोलीस ठाण्यात दाखल होता अपहरणाचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 18:21 IST2024-08-26T18:20:38+5:302024-08-26T18:21:13+5:30
विशेष म्हणजे या वयोवृद्धाचे अपहरण केल्याप्रकरणी मुलाच्या तक्रारीवरून नायगांव पोलिसांनी सोमवारी सकाळीच अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

कारमध्ये बांधलेल्या अवस्थेत सापडला, हत्या केलेला वयोवृद्धाचा मृतदेह; पोलीस ठाण्यात दाखल होता अपहरणाचा गुन्हा
नालासोपारा (मंगेश कराळे) - अपहरण केलेल्या ७५ वर्षीय वयोवृद्धाचा कारमध्ये दोरीच्या साहाय्याने बांधून हत्या केलेला मृतदेह मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वसई फाटा येथे सापडल्याने वसईत खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आहे. विशेष म्हणजे या वयोवृद्धाचे अपहरण केल्याप्रकरणी मुलाच्या तक्रारीवरून नायगांव पोलिसांनी सोमवारी सकाळीच अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगरच्या आर्केट बिल्डिंगमध्ये राहणारे व पेट्रोल पंपांचे मालक शैलेश काकराणी (४५) यांचे वयोवृद्ध वडील रामचंद्र काकराणी (७५) यांचे रविवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कामणच्या नागले येथून अपहरण झाल्याची तक्रार नायगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रामचंद काकराणी हे त्यांची मोटार कार चालक मुकेश खूबचंदाणी (५४) याचेसह विरारच्या चंदनसार विरार येथील स्वतःच्या पेट्रोलपंपावर जाण्यासाठी निघाले. दुपारी साडे पाच वाजण्याच्या सुमारास रामचंद्र यांनी पेट्रोलपंपावरील मॅनेजर दयानंद पाण्डे याच्याकडून ४० हजार रोख रक्कम घेवून निघाले पण ते घरी पोचले नाही.
घरच्यांनी त्यांचा इतरत्र शोध घेतला पण ते कोठेही मिळून आले नाही. त्यांच्या मोबाईलचे लोकेशन काढल्यावर त्यांचा व चालकाचा मोबाईल नागले गावचे हद्दीत रोडच्या बाजूला मिळून आले. त्यापैकी चालकाचे मोबाईल फोनमध्ये सिमकार्ड नव्हते. चालक मुकेश खूबचंदानी याने रामचंद काकराणी यांचे वयोवृध्दपणाचा फायदा घेवून त्यांचेकडील पैशांसाठी किंवा अन्य कोणत्या कारणासाठी अपहरण केल्याची तक्रार दिली आहे.