तारापूरमधील जे पी एन फार्मा सिटीकल कंपनीत स्फोट; २१ वर्षीय कामगाराचा मृत्यू, तीन जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 16:09 IST2023-02-17T16:08:21+5:302023-02-17T16:09:17+5:30
स्फोटामध्ये मृत्यू झालेला तरुण हा पालघर तालुक्यातील दहिसर गाव येथील राहणारा असून प्रयाग घरत असे त्याचे नाव आहे.

तारापूरमधील जे पी एन फार्मा सिटीकल कंपनीत स्फोट; २१ वर्षीय कामगाराचा मृत्यू, तीन जण जखमी
पालघर- तारापूर औद्योगिक वसाहतीतील जे पी एन फार्मा सिटीकल कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये २१ वर्षीय तरुण कामगाराचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी आहेत.
स्फोटामध्ये मृत्यू झालेला तरुण हा पालघर तालुक्यातील दहिसर गाव येथील राहणारा असून प्रयाग घरत असे त्याचे नाव आहे. तर इतर तीन जखमींना बोईसरमधील संजीवनी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यांची नावे समजली नसली तरी प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.
स्फोट झाल्याचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. कंपनीतील बॉयलरमध्ये प्रक्रिया सुरू असताना बॉयलरचा कंडेन्सर तुटून स्फोट झाला व त्या स्फोटात वायुची बाधा झाल्याने जखमींची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.