Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 12:07 IST2025-12-21T12:06:08+5:302025-12-21T12:07:48+5:30
Jawhar Local Body Election Result 2025: गेल्या २ डिसेंबरला जव्हार नगरपरिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीत एकूण २० जागांपैकी १४ जागा भाजपच्या पारड्यात गेल्या आहेत.

Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कंबर कसून मैदानात उतरले होते. सर्वत्र जोरदार प्रचार बघायला मिळाला. आता या निवडणुकीचे निकाय हाती यायला सुरुवात झाली आहे. यातच, जव्हान नगरपरिषदेचा निकाल हाती आला असून, येथे भाजपने मोठा विजय मिळवला आहे. भाजपच्या पूजा उदावंत या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत.
२० पैकी १४ नगरसेवक भाजपचे -
गेल्या २ डिसेंबरला जव्हार नगरपरिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीत एकूण २० जागांपैकी १४ जागा भाजपच्या पारड्यात गेल्या आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेला केवळ २ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. याशिवाय, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ नगरसेवक निवडून आले आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ १ जागाच मिळाली आहे.
नगरसेवक पदासाठी 69, तर नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार होते रिंगणात -
जव्हार नगर परिषदेतील नगरसेवक पदाच्या 20 जागांसाठी तब्बल 69 उमेदवार तर नगराध्यक्ष पदासाठी एकूण पाच उमेदवार रिंगणात होते. याशिवाय, जिल्ह्यातील पालघर नगरपरिषदेसाठी 29 जागांसाठी तब्बल 112 उमेदवार रिंगणात होते तर नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले होते. तर डहाणू नगर परिषदेमध्ये एकूण 27 जागांसाठी 65 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये थेट लढत झाली होती. तसेच, वाडा नगरपंचायतच्या 17 जागांसाठी तब्बल 67 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदासाठी सात उमेदवार रिंगणात होते.