शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

विक्रमगडमध्ये भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 12:37 AM

५ जिल्हा परिषद गट व १० पंचायत समिती गणांसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विक्रमगड पंचायत समितीतील भाजपच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्थानिक विकास आघाडीने एकत्र लढा देत सुरुंग लावला आहे.

राहुल वाडेकर विक्रमगड : विक्रमगड तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गट व १० पंचायत समिती गणांसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विक्रमगड पंचायत समितीतील भाजपच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्थानिक विकास आघाडीने एकत्र लढा देत सुरुंग लावला आहे.भाजपला पंचायत समितीच्या १० गणांपैकी फक्त दोन जागांवर, तर जि.प.च्या ५ गटांमध्ये भाजपला एकही जागा मिळवता आली नाही. यापूर्वी पंचायत समितीच्या ६ जागांवर आणि जि.प.च्या पाचही गटांमध्ये भाजपने विजय मिळवला होता. मात्र या निवडणुकीत पक्षामध्ये असलेल्या मतभेदाचा फायदा अपक्ष (विकास आघाडी) व राष्ट्रवादी यांना होऊन विक्रमगड पंचायत समितीवर एकत्रितरीत्या ६ जागांवर अपक्ष (विकास आघाडी) व राष्ट्रवादी संयुक्त उमेदवार निवडून आले आहेत. या आघाडीने भाजपला पूर्णपणे शह दिला असून भाजपला पंचायत समितीच्या अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे.तर जिल्हा परिषद गटामध्ये अपक्ष (विकास आघाडी)- १, शिवसेना- १, राष्ट्रवादी- ३ तर पंचायत समिती गणामध्ये अपक्ष (विकास आघाडी)- २, शिवसेना- १, राष्ट्रवादी- ४, माकपा- १, भाजपा- २ असे उमेदवार विजयी झाले आहेत.विक्रमगड विधानसभेनंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकालही भाजपच्या दृष्टीने धक्कादायक लागलेले आहेत. कारण या पंचायत समिती व पालघर जिल्हा परिषद भाजपची सत्ता होती. दरम्यान, ५ गटांसाठी व १० गणांच्या जागांसाठी एकूण ८६ उमेदवार रिंगणात होते. मात्र गेल्या निवडणुकीच्या मानाने या निवडणुकीत मतदारांनी संपूर्ण तालुक्यातून भरघोस प्रतिसाद दिल्याने ७०.८२ टक्के मतदान झाले.>यापूर्वी भाजपला मतदारांनी एकहाती सत्ता देऊन पाहिले, मात्र हवा तसा विकास साधला गेला नसल्याने तसेच यापूर्वी भाजपला शह देण्याकरिता कुणीही मैदानात नव्हते, मात्र आता आम्ही मैदानात उतरलो असून आमच्या सामाजिक कामांमुळे जनतेने आम्हास पसंती दिली आहे. आज विकास आघाडी व राष्ट्रवादी मिळून पंचायत समितीच्या ६ जागांवर तर जिल्हा परिषदेच्या ४ जागांवर विजय प्राप्त झाल्याने आम्ही विक्रमगड पंचायत समितीवर आमचा सभापती व उपसभापती बसेल. तसेच आमच्यावर मतदारांनी जो विश्वास टाकलेला आहे, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. जाहीरनाम्यामध्ये दिलेली सर्व विकासकामे करू. कोणत्याही प्रभागातील जनतेला नाराज करणार नाही, असे आश्वासन देतो.-नीलेश सांबरे, अपक्ष उमेदवार> विक्रमगड पंचायत समिती गणातील विजयी उमेदवारप्रभाग-उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेली मते१) तलवाडा-सुनिता घाटाळ राष्ट्रवादी १७००२) वेहेलपाडा-सुभाष भोये भाजप १३५०३) चिंचघर-कांता सुतार अपक्ष ३२९७ (विकास आघाडी)४) आलोंडा -विनोद भोईर अपक्ष २२४६ (विकास आघाडी)५) दादडे-लाडक्या लहांगे माकपा १२५२६) डोल्हारी खुं-अंजली भोये राष्ट्रवादी २७५०७) कुंर्झे-नम्रता गवारी शिवसेना २३८२८) करसुड-रु चिता कोरडा राष्ट्रवादी २२६०९) जांभा-यशवंत कनोजा राष्ट्रवादी १९७३१०) उटावली -मनोज बोरसे भाजप २३३२>विक्र मगड जिल्हा परिषद गटातील विजयी उमेदवारप्रभाग -उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेली मते1 - तलवाडा -भारती कामडी शिवसेना २७४१2 - दादड-गणेश कासट राष्ट्रवादी ४५९६3 - आलोंडा-नीलेश सांबरे अपक्ष ७१४७ (विकास आघाडी)4 - कुंर्झे-ज्ञानेश्वर सांबरे राष्ट्रवादी ४१७६5 - उटावली-संदेश ढोणे राष्ट्रवादी ४१२०

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद