शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

भाजपाची प्रेयसी हेच शिवसेनेचे स्टेटस; प्रकाश आंबेडकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 01:59 IST

पालघर : सध्याची परिस्थिती पाहता भाजपाची सत्ता पुन्हा येईल असे अजिबात दिसत नसून सत्तेत शिवसेना भाजपाची प्रेयसी म्हणून भूमिका ...

पालघर : सध्याची परिस्थिती पाहता भाजपाची सत्ता पुन्हा येईल असे अजिबात दिसत नसून सत्तेत शिवसेना भाजपाची प्रेयसी म्हणून भूमिका बजावत असल्याची टीका भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पालघरमध्ये सोमवारी केली.आंबेडकर व खा. असदुद्दीन ओवैसी यांच्या ‘सत्ता संपादन संकल्प’ सभेचे आयोजन पालघरच्या डॉ. आंबेडकर मैदानात केले होते. काँग्रेस जो पर्यंत आरएसएसला घटनेच्या चौकटीत आणण्याचा आराखडा देत नाही आणि त्यांच्या विरोधात लढण्याचे जाहीर करीत नाही तो पर्यत काँग्रेसशी कुठलीही चर्चा करणार नाही असे त्यांनी सांगितले.यावेळी मुख्यमंत्र्यांवर टीका करीत विकास करायचा असेल तर ठेकेदार नसलेला मुख्यमंत्री असावा असे ते म्हणाले. आजपर्यंत आदिवासीच्या विकासासाठी १४ हजार कोटींचा निधी खर्च झाला. एवढ्या पैशात पालघर आणि नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषण दूर झाले असते. परंतु समस्या ‘जैसे थे’ असल्याने एवढा कोट्यवधींचा निधी गेला कुठे? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.कोकणातील किनारपट्टीवर राहणाऱ्या कोळी, आगरी, भंडारी या समाजाने आज पर्यंत इतर समाजाचे लोकप्रतिनिधी निवडून देण्याचेच काम केले असून स्वत:चा उमेदवार निवडून येईल याकडे कधी गांभीर्याने पाहिले नसल्याचे सांगितले. समुद्रातील जलवाहतूक, पर्यटन, नौदल, सागरी सुरक्षा दल, सागरी पोलीस ठाणे, ओएनजीसी आदी विभागातल्या नोकरीत मच्छीमार समाजाला ३० टक्के आरक्षण देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.ओवेसीने वादग्रस्त विधाने केल्यास कायदा सुव्यवस्था बिघडू शकते, असे पत्र बजरंग दलाने पालघर पोलीस स्टेशनला दिले होते. त्यामुळे पोलीस चिंताग्रस्त होते, परंतु खा. ओवेसी या क्र ार्यक्र माला उपस्थित राहू न शकल्याने स्थानिक पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर