वसई-विरार महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 23:56 IST2020-12-04T23:56:42+5:302020-12-04T23:56:53+5:30
निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी

वसई-विरार महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार तयारी
वसई : वसई-विरारमधील सहा मंडळांच्या माध्यमातून दोनदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन वसई भाजपकडून करण्यात आले. याच प्रशिक्षण शिबिराच्या आढावा बैठकीदरम्यान वसईतील वकील पी.एन. ओझा यांनी तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.
वसई-विरार महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार तयारी चालू असून जिल्हाध्यक्ष राजन नाईक व महासचिव उत्तम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चेबांधणी केली जात आहे. या माध्यमातून कार्यकर्त्यांना प्राेत्साहित केले जात आहे.
दरम्यान, मागील आठवड्यातच ॲड. साधना धुरी, बविआचे प्रमुख कार्यकर्ते संजय अचीपालिया, शिवसेनेचे विनोद सक्सेना व किशोर गुप्ता यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या वेळी भाजप प्रदेश प्रतिनिधी शेखर धुरी, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता नर, जिल्हा महासचिव राजू म्हात्रे, महेंद्र पाटील, आम्रपाली साळवे, रामनुजम, मॅथ्यू कोलासो, अपर्णा पाटील, श्रीकुमारी मोहन, रमेश पांडे, गोपाळ परब, अभय कक्कड, अजित अस्थाना, सिद्धेश तावडे आदी उपस्थित होते.