शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
2
“मुंबईसाठी अदानी अन् आमची नैतिक लढाई सुरूच राहणार, ती थांबवणार नाही”: संजय राऊत
3
मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी 
4
आता PF च्या कामासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; 'पासपोर्ट केंद्रां'प्रमाणे मिळणार सेवा
5
कुलदीप सेंगर पुन्हा तुरुंगात जाणार? स्थगित शिक्षेविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी करणार सर्वोच्च न्यायालय
6
'ऑपरेशन सिंदूर'यशस्वी! पाकिस्तानने सात महिन्यानंतर कबूल केले; ब्रह्मोसचा जबरदस्त निशाणा, नूर खान एअरबेसवर विध्वंस
7
सावधान! मोबाईलवर येणारा एक मेसेज तुमचं बँक खातं रिकामं करू शकतो; काय आहे हा नवा 'SIM Box Scam'?
8
राज-उद्धव एकत्र; भाजप-शिंदेसेना तह आणि युद्ध..!
9
'मला वाटलं पुढचा स्टीव्ह जॉब्स मीच आहे..;' सर्गेई ब्रिन यांनी गुगलच्या 'या' अपयशाबद्दल व्यक्त केली खंत
10
"त्यांनी कधीच मला सुनेसारखं वागवलं नाही...", सासूबाईंच्या निधनानंतर अमृता देशमुखची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट
11
निसर्गाचा अजब चमत्कार! पृथ्वीवर एक असे ठिकाण जिथे कधीच पडत नाही थंडी; शास्त्रज्ञही थक्क
12
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
13
BMC Election 2026: नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
14
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
15
५०० वर्षांनी ५ दुर्मिळ योगात २०२६ प्रारंभ: ८ राशींना लक्षणीय लाभ, अकल्पनीय पद-पैसा; शुभ घडेल!
16
Akola Municipal Election 2026: इच्छुकांची धाकधूक वाढली, भाजपची यादी शेवटच्या क्षणी; कारण...
17
सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' अन् आलियाचा 'अल्फा' यांच्यात क्लॅश! 'हा' सिनेमा होणार पोस्टपोन?
18
"जयपूरमध्ये बॉम्बस्फोट होणार!", मध्यरात्री फोन करून धमकी दिली; पोलिसांनी पकडल्यावर वेटर जे म्हणाला... 
19
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
20
Astro Tips: तुमच्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी आहे का? नसेल तर 'हे' नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 11:27 IST

मीरारोडच्या जे पी इन्फ्रा संकुलमध्ये मीरा भाईंदर शहर जिल्हा प्रभाग १३ च्या वतीने महिला संमेलन व हळदीकुंकूचे आयोजन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क मिरारोड - मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीची आचार संहिता लागू असताना मीरारोड मध्ये भाजपाच्या वतीने आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमात महिलांना भेटवस्तू वाटप करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर कोंग्रेसने भाजपा पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. उघडपणे हे गैरप्रकार सुरू असताना पोलिस, महापालिका आणि आचार संहिता पथके भाजपचे काम करत असल्याचे आरोप काँग्रेस सह विविध पक्ष व संघटना यांनी केला आहे. 

मीरारोडच्या जे पी इन्फ्रा संकुल मध्ये मीरा भाईंदर शहर जिल्हा प्रभाग १३ च्या वतीने महिला संमेलन व हळदीकुंकूचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या व्यासपीठ  बॅनरवर भाजपा पक्षाच्या नाव आणि चिन्ह सह राजकारणी यांचा फोटो टाकलेला होता. यावेळी महिलांना हळदी कुंकूसह विविध भेटवस्तू देण्यात आल्या. सदर प्रभागातील भाजपचे माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार संजय थेराडे, भाजपच्या पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार प्रीती जैन सह भाजपा कार्यकर्त्या उपस्थित होत्या. ह्या सर्व कार्यक्रम आणि भेटवस्तू वाटपाची छायाचित्रे समाज माध्यमांवर देखील व्हायरल झाली आहेत. 

आचार संहिता काळात सणाच्या नावाखाली कार्यक्रम करतेवेळी निमंत्रण पत्रिका, बॅनर वर पक्ष, निवडणूक चिन्ह, राजकीय फोटो असू नये. कोणत्याही राजकीय नेत्याचा व उमेदवाराचा सत्कार आयोजित करू नये. कोणत्याही राजकीय नेत्याने, उमेदवाराने कोणत्याही वस्तूंचे वाटप करू नये असे निवडणूक आयोगाच्या आदेशात स्पष्ट आहे. इतकेच काय तर अश्या कार्यक्रम साठी सार्वजनिक मंडळाचा आधार घेऊ नये असे आयोगाने स्पष्ट केले असताना देखील सर्रास आचार संहिता भंग करण्यात आली व त्याकडे पोलीस, महापालिका आणि आचार संहिता पथके यांनी कानाडोळा चालवला असल्याचा आरोप जागरूक नागरिकांनी केला आहे. 

मतदारांना भ्रष्ट मार्गाने मतदानासाठी आमिष दाखवले गेल्याने या प्रकरणात आधी तात्काळ भाजपाचे थेराडे, प्रीती जैन आदींवर गुन्हा दाखल करा. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्या, पुरावे नष्ट होऊ देऊ नका. उपस्थितांची पोलिसांनी सखोल चौकशी करून वाटप केलेल्या व छायाचित्रातील सर्व भेट वस्तू जप्त कराव्यात. ह्या सर्व साठी खर्च झालेला पैसा हा भ्रष्टाचाराचा वा काळा पैसा असल्याची दाट शक्यता पाहता त्याची सखोल चौकशी करून भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक अधिनियम आणि मनी लॉन्ड्रींग नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रभाग १३ मधील काँग्रेसचे इच्छुक आणि युवक काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र खरात यांनी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Distributes Gifts at Haldi Kumkum in Miraroad; Congress Demands FIR

Web Summary : BJP allegedly distributed gifts at a Haldi Kumkum event in Miraroad during election code of conduct. Congress demands FIR, alleging violation and accusing authorities of inaction. Congress seeks investigation into potential corruption and money laundering.
टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporation Electionमीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूक २०२६Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाcongressकाँग्रेस