मीरारोड - मीरारोडच्या शांती नगर प्रभाग २० मधील मतदान केंद्रात भाजपच्या उमेदवार प्रतिनिधी यांनी छातीवर चारही भाजपा उमेदवार यांचे क्रमवार नावे असलेले कार्ड लावलेली आढळून आली. या विरोधात मनसे उमेदवार यांनी कारवाईची मागणी केली आहे.
शांतीनगर येथील मतदान केंद्रात सकाळ पासून मतदानास सुरुवात झाली. मात्र भाजपा उमेदवार यांचे मतदान केंद्रात कार्यरत असलेले प्रतिनिधी चक्क छातीवर भाजपाच्या उमेदवारांची क्रम निहाय नावे असलेले कार्ड लाऊन बसलेले होते. मनसेच्या उमेदवार दृष्टी घाग आणि मनसेचे पदाधिकारी दिलीप घाग हे जेव्हा मतदान केंद्रात गेले तेव्हा हा प्रकार पाहून त्यांनी संताप व्यक्त केला.
मतदान केंद्रात उघडपणे गैरप्रकार सुरू असताना एकही पोलिस व केंद्रातील अधिकारी यांनी त्यांना रोखले नाही. उलट भाजपा उमेदवारांचा प्रचार करून भ्रष्ट मार्गाने मतदारांवर प्रभाव टाकला जात असल्याचा आरोप घाग यांनी केला.
भाजपच्या सर्व प्रतिनिधी यांनी उमेदवारांच्या नावांचे कार्ड लावले असताना एकही मतदान केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना रोखले का नाही ? असा सवाल केला.
पोलिस व पालिका यांनी तत्काळ ह्या प्रतिनिधी आणि उमेदवार वर गुन्हा दाखल करावा. आणि उमेदवारी रद्द करावी अशी मागणी दृष्टी घाग यांनी केली आहे.
Web Summary : MNS alleges BJP representatives at a Mira Road polling booth wore cards displaying candidate names, influencing voters. MNS demands police action and disqualification.
Web Summary : मीरा रोड के एक मतदान केंद्र पर भाजपा कार्यकर्ताओं द्वारा उम्मीदवारो के नाम के कार्ड पहनने पर मनसे ने मतदाताओ को प्रभावित करने का आरोप लगाया। मनसे ने पुलिस कार्रवाई और अयोग्यता की मांग की।