शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

वीजबिल वाढीवरून वसईत भाजपा आक्रमक; वसई महावितरण कार्यालयासमोर केली होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 6:11 PM

उत्तम कुमार यांच्या आंदोलनानंतर महावितरण कार्यल्याकडून महावितरण अधिकारी फुलपघारे यांनी आंदोलन ठिकाणी येऊन, ज्यांना अवास्तव वीजबिल आलेले आहे त्यांचे तात्काळ निरसन करण्यात येईल, अशी ग्वाही दिली

आशिष राणे 

वसई -वाढीव विजबिलावरून भाजपा महाराष्ट्र प्रदेशकडून आंदोलन जाहीर केल्यानंतर त्याचे पडसाद वसईत सोमवारी जोरदार उमटले. वसई महावितरण कार्यालयासमोर भाजपाने जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने वाढीव विजबिलांची होळी करत राज्यातील महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात "चोर चोर बिजली चोर" अशा अनेक घोषणा देत आपला रोष व्यक्त करत निषेध व्यक्त केला.

जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांनी उपस्थितांना संबोधित करताना, फक्त स्वतःच्या विकासासाठी एकत्रित आलेल्या तीन पक्षांची तिघाडी तय्यार करून अनैसर्गिक पणे उदयास आलेल्या या महाभकास आघाडी कडून जनतेला कोणत्याही अपेक्षा नाहीत. जनतेचा कौल झुगारून ही आघाडी तय्यार झाली आहे, त्यामुळे जनतेशी व त्यांच्या भावनांशी या सरकारला काही देणंघेणं नाही. असे ते म्हणाले.

उत्तम कुमार यांच्या आंदोलनानंतर महावितरण कार्यल्याकडून महावितरण अधिकारी फुलपघारे यांनी आंदोलन ठिकाणी येऊन, ज्यांना अवास्तव वीजबिल आलेले आहे त्यांचे तात्काळ निरसन करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी उत्तम कुमार यांना व उपस्थितांना देण्यात आली. तसेच यावेळी ऍड. साधना धुरी यांनी बोलताना, असंवेदनशील असे हे सरकार आहे. वेळीच या सरकारची उचलबांगडी होणे गरजे आहे. अशी टीका त्यांनी महाआघाडी सरकारवर केली.

यावेळी जिल्हा सचिव अपर्णा पाटील, रमेश पांडे, सुरेश देशमुख, सिद्धेश तावडे, मयांक सेठ, सुधान्शु चौबे, मेथीव कोलासो, महेश सरवणकर, किरण पवार, केतन गांधी, संजय अचीपालिया, रिटा  इस्सार, दिनेश मकवाना, इकबाल मुखी, आशिष सुळे, एबीन अब्राहम, एच. आर. सकसेना, ऋषी वोरणी, अभिजीत आचारी, शैली डांग आदी पदाधिकारी व मोठ्याप्रमाणात नागरीक उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपाelectricityवीज