अडीच कोटीच्या ११ रस्त्यांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
By Admin | Updated: March 26, 2017 04:00 IST2017-03-26T04:00:03+5:302017-03-26T04:00:03+5:30
सार्वजनिक बांधकाम च्या विक्र मगड उपविभागाच्या दोन कोटी पन्नास लाखाच्या निधीतून माले ते कशिवली

अडीच कोटीच्या ११ रस्त्यांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
विक्रमगड : सार्वजनिक बांधकाम च्या विक्र मगड उपविभागाच्या दोन कोटी पन्नास लाखाच्या निधीतून माले ते कशिवली, जाधवपाडा ते यशवंतनगर, विक्र मगड ते वेहेलपाडा, विक्र मगड ते आंबेघर, पडवळपाडा ते आंबेघर, आलोंडे ते कोकणीपाडा, गडदे ते बाळापुर, आलोंडे ते सावरोली या रस्त्यांच्या कामचे भूमिपूजन आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्हाचे पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच तालुक्यातील मोठया पूलांनाही मंजूरी देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुरेखा थेतले, भाजपा प्रदेश सदस्य बाबजी काठोळे, तालुकाध्यक्ष संदिप पावडे, पंचायत समितीच्या सभापती जिजाताई टोपले, उपसभापती मधुकर खुताडे, कावळे मठाचे मठाधिपती बालकनाथ बाबा, सार्वजनिक बांधकाम च्या विक्रमगड उपविभागाचे अभियंता डी.जी.होले, जिल्हा चिटणीस महेश आळशी यांच्यासह पालघर जिल्हा परिषदचे व विक्र मगड पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर)