वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या दोघा आरोपीना अटक
By धीरज परब | Updated: January 31, 2023 19:20 IST2023-01-31T19:19:05+5:302023-01-31T19:20:07+5:30
अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षच्या भाईंदर शाखेने वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोघांना अटक केली आहे.

वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या दोघा आरोपीना अटक
मीरारोड : अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षेच्या भाईंदर शाखेने वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोघांना अटक केली आहे. जिनत खान रा. मालाड, मालवणी हि वेश्या व्यवसायासाठी तरुणी पुरवण्याचे काम मोबाईल व व्हॉट्सअपद्वारे करते, तसेच गिऱ्हाईकास लॉजमध्ये खोली बुक करायला सांगून तेथे तरुणी पुरवते अशी माहिती पोलीस निरिक्षक समीर अहिरराव यांना मिळाली.
अहिरराव सह उमेश पाटील, केशव शिंदे, सम्राट गावडे, आफ्रिन जुन्नेदी यांच्या पथकाने सापळा रचून वेश्यादलाल जिनत हिला मीरारोडच्या रामदेव पार्क भागातील एका लॉज जवळ बोलावले. तिचा रिक्षा चालकसाथीदार सद्दाम नसिम हुसेन (२५) रा. साकिनाका, अंधेरी हा एका तरुणीस लॉज मध्ये पाठ्वण्या करता घेऊन आला. वेश्यामागणीसाठी ठरलेली रक्कम सद्दाम याने स्वीकारतच पोलिसांनी त्याला व जिनत ह्या दोघांना पकडले. चौकशीत पोलिसांना सोनु व पिन्टु अशी आणखी दोघा आरोपींची नावे समजली असून त्यांचा शोध सुरु आहे. मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .