शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

बांगरचोळे जि.प. शाळेने दिली अनोखी दिवाळी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 11:02 PM

स्वत: केलेले कंदिल, पणत्या वाटल्या घराघरांत, झाले सर्वत्र कौतुक

मनोर : जंगलपट्टी भागात येणाऱ्या बांगरचोळा जिल्हा परिषद मराठी शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी कार्यानुभवातून गावकºयांना आगळी वेगळी दिवाळी भेट दिली.मनोर जवळील बांगरचोळा जि. प. मराठी शाळेतील आदिवासी मुलांनी दिवाळीसाठी मातीपासून पणत्या तयार केल्या. तसेच आकाश कंदील तयार केले. मुलांनी एक आकाश कंदील व दोन पणत्या आपल्या गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन दीपावलीच्या शुभेच्छांसह दिल्या. मुलांनी शाळेतील माजी शिक्षक रोटकर सर, निलकंठे सर, पवार सर यांना दिवाळी शुभेच्छा कार्ड व आकाश कंदील भेट दिले. मुलांनी अगदी टाकाऊ वस्तू म्हणजे पिण्याच्या पाण्याची बॉटल जी सहज उपलब्ध होते, त्यापासून आकाश कंदील बनवले. पाणी पिऊन ती बॉटल परिसरात फेकून दिली जाते त्यातून पर्यावरणाची हानी होते, अशा टाकाऊ वस्तूपासून मुलांनी एक बॉटल आणि फुग्यापासून तसेस कार्डपेपर वापरून आकर्षक सुंदर आकाश कंदील बनवले होते ते बघून मुलांचे पालक गावकरी आणि शाळा व्यवस्थापन समिती यांनी मुलांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले. मुलांना आणि शिक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ह्या उपक्रमामध्ये शाळेचे प्रमुख शिक्षक बाळू गोटे आणि सह शिक्षक प्रकाश राव यांनी मेहनत घेतली म्हणून सर्वांनी कौतुक केले. या आधीही त्यांनी रक्षाबंधन च्या वेळी राख्या तयार केल्या होत्या, अशा उपक्र मातून शाळेत मुलांची उपस्थिती वाढणार आणि कार्यानुभव या विषयाबाबत मुलांची आवड निर्माण होईल असे मत केंद्र प्रमुख गजानन पाटील यांनी मांडले व मुलांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले.

टॅग्स :DiwaliदिवाळीVasai Virarवसई विरार