शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

अनधिकृत बांधकामांवर डहाणूत कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 11:02 PM

नगरपरिषदेची कारवाई : नागरिकांत समाधान

डहाणू : स्वच्छ डहाणू, सुंदर डहाणू हे ब्रीद यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या नगरपरिषदेने सोमवारी शहरातील अनियमित, अनिधकृत बांधकामे जमीनदोस्त करून धडक कारवाई केली. त्यामुळे येथील बेकायदेशीर स्टॉल, टपऱ्या, हातगाड्या, दुकानांची रस्त्यावर आलेली अनियमित बांधकामे यापासून सुटका झाल्याने रस्त्यांनी व डहाणूकरांनी मोकळा श्वास घेतला. नगरपरिषद प्रशासनाने केलेल्या या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

निसर्गाचे हिरवेगार कोंदण लाभलेल्या डहाणू नगरीत स्टेशन, इराणी रोड, सागर नाका, तारपा चौक, मसोली, पोलीस स्टेशन परिसर, थर्मल पॉवर स्टेशन रोड या भागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले होते. याबाबत अनेक स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला लेखी निवेदने सादर केली आहेत. रस्त्यालगत असलेल्या अनेक दुकानदारांनी दरवाजासमोरील भागात अनियमित बांधकामे विस्तारित केली होती. फेरीवाल्यांचे स्टॉल, वडापाव, खाद्यपदार्थ, अल्पोपहार, चायनीज पदार्थ, कलिंगड विक्रेत्यांचे तंबू, चहाच्या टपºया, फळांच्या अनियमित पार्किंगच्या गाड्या इत्यादीवर नगरपरिषद प्रशासनाने कारवाई केली. आता अशीच कारवाई पालिकेने पक्क्या बांधकांमावर करावी, नाहीतर ती नाटकी ठरेल, अशी चर्चा आहे.कारवाईबाबत जनतेत समाधानच्डहाणूतील या अनियमित बांधकामांमुळे शहरात वाहतूक कोंडी, प्रवाशांना रहदारीसाठी त्रास, अस्वच्छतेचा प्रश्न तसेच दुर्घटनांत वाढ अशा समस्या निर्माण झाल्याने योग्य वेळी नगरपरिषदेने कारवाईचा बडगा उगारून अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्याने डहाणूच्या नागरिकांनी या कारवाईचे समाधान व्यक्त केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून ही कारवाई सुरू असून यापुढेही अनियमित बांधकामांवर ती करण्यात येईल, असे नगरपरिषद प्रशासनाने कळविले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारTrafficवाहतूक कोंडी