नालासोपाऱ्यात स्मशानभूमी तोडण्याचा प्रयत्न, मनसे कार्यकर्त्यांनी हाणून पाडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 00:47 IST2020-03-19T00:47:06+5:302020-03-19T00:47:36+5:30
नालासोपारा पूर्वेकडील तुळिंज डोंगराखाली वनविभागाच्या जागेवर कित्येक वर्षांपासून स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीच्या बाजूला दफनभूमीही आहे.

नालासोपाऱ्यात स्मशानभूमी तोडण्याचा प्रयत्न, मनसे कार्यकर्त्यांनी हाणून पाडला
नालासोपारा : मृतदेह जळत असतानाही स्मशानभूमी तोडण्याचा वनविभागाचा प्रयत्न नालासोपाºयातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला.
नालासोपारा पूर्वेकडील तुळिंज डोंगराखाली वनविभागाच्या जागेवर कित्येक वर्षांपासून स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीच्या बाजूला दफनभूमीही आहे. या परिसरात महापालिकेची स्मशानभूमी नसल्याने या स्मशान आणि दफनभूमीवर येथील हजारो नागरिक अवलंबून आहेत. वनखात्याच्या जमिनीवर लोकांनी उभारलेल्या या स्मशानभूमीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. पाणी नाही, डोक्यावर छप्पर नाही, आजूबाजूला घाणीचे साम्राज्य, लाकडे उपलब्ध, मोकाट गुरांचा वावर अशा परिस्थितीतही नाईलाजाने मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.
जागा वनविभागाची असल्याने महापालिकेला स्मशानभूमी दुरुस्त करता येत नव्हती. मात्र, लोकांची सततची मागणी आणि स्मशानाची दुरवस्था पाहून महापालिकेने ही स्मशानभूमी दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले होते. बांधकामाचे पिलर आणि फाउंडेशन बांधून तयार होताच वनविभागाने कारवाईचे शस्त्र उगारले आणि प्रचंड फौजफाटा आणून बांधकाम तोडण्यास सुरुवात केली. एका बाजूला मृतदेह जळतो आहे, दुसºया बाजूला आणखी एक मृतदेह अंतिम संस्कारासाठी ताटकळत होता, तरीही वनविभागाकडून स्मशानभूमी तोडण्याचे काम सुरू होते. ही माहिती मिळाल्यावर मनसेचे शहराध्यक्ष राज नागरे यांनी सदर ठिकाणी धाव घेतली. कारवाई करणाºया वनविभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी मनसे स्टाईलने झापले आणि जेसीबीसह हाकलून लावले. त्यामुळे ही स्मशानभूमी तूर्तास वाचली आहे.