सहायक पोलीस निरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 05:12 IST2020-01-05T05:12:20+5:302020-01-05T05:12:26+5:30
सफाळे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप वसंत सानप (३८) यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना घडली.

सहायक पोलीस निरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
नालासोपारा : सफाळे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप वसंत सानप (३८) यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना घडली. संपूर्ण पालघर जिल्ह्यातील पोलिसांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सानप हे मूळचे नाशिक येथील राहणारे असून गेल्या वर्षभरापासून सफाळे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहात होते. सानप यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी नाशिक येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
रायझिंग डे सप्ताहानिमित्त पालघर तालुक्यातील सर्व पोलीस ठाण्यांअंतर्गत सफाळे येथील माकुणसार भागात शनिवारी क्रिकेटचे सामने खेळवण्यात आले. त्या वेळी मैदानात खेळत असताना अचानक सानप यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तत्काळ वसई पूर्वेकडील प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला आहे.