सहायक आयुक्त गोन्सालविस निलंबित; इमारत दुर्घटनेप्रकरणी न्यायालयीन कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 08:14 IST2025-12-12T08:12:54+5:302025-12-12T08:14:22+5:30
विरार पूर्वेस विजयनगरातील रमाबाई अपार्टमेंट ही चार मजली इमारत २६ ऑगस्ट रोजी कोसळली होती. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला होता, तर नऊ जण जखमी झाले होते.

सहायक आयुक्त गोन्सालविस निलंबित; इमारत दुर्घटनेप्रकरणी न्यायालयीन कोठडी
नालासोपारा : वसई-विरार महापालिकेचे सहायक आयुक्त गिल्सन गोन्सालविस यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. १७ निष्पाप नागरिकांचा बळी घेणाऱ्या इमारतीविरोधात विहित मुदतीत कारवाई न केल्यामुळे त्यांना अटक झाली आहे. या प्रकरणाात बेकायदा व धोकादायक असलेली इमारत खाली न करता गुन्हा न दाखल केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. याशिवाय पालिका आयुक्त सूर्यवंशी यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संजय हेरवडे यांनी दिली.
शाळकरी मुलांना ‘एआय’ शिकवण्याची इतकी घाई कशाला?
विरार पूर्वेस विजयनगरातील रमाबाई अपार्टमेंट ही चार मजली इमारत २६ ऑगस्ट रोजी कोसळली होती. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला होता, तर नऊ जण जखमी झाले होते. ऐन गणेशोत्सवात घडलेल्या दुर्घटनेने संपूर्ण शहर हादरले होते. रमाबाई अपार्टमेंट ही ४ मजली अनधिकृत इमारत होती. यात ५० सदनिका होत्या; मात्र अवघ्या काही वर्षांतच ही इमारत जीर्ण झाली होती. विकासकाने इमारतीच्या रहिवाशांची दिशाभूल करून इमारत अधिकृत असल्याचे भासवले होते. त्यामुळे रहिवासी कर भरत होते. यावर आवश्यक कारवाई न झाल्यामुळे गोन्सालविस यांना आरोपीच्या यादीत समाविष्ट केले होते.
जानेवारीत होणार होते सेवानिवृत्त
सहायक आयुक्त गिल्सन गोन्सालविस यांना ४ डिसेंबरला अटक झाल्यानंतर ४८ तास पोलिस कोठडीत ठेवण्यात आले.
महाराष्ट्र नागरी सेवा कायदा १९७९ नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे जामिनावर बाहेर आल्यानंतरही गोंसालवीस यांना मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे.
विशेष म्हणजे जानेवारी २०२६ मध्ये ते सेवानिवृत्त होणार होते. तत्पूर्वीच गोन्सालविस यांना कोठडीत बसावे लागले आहे.