आशीष साळवीच्या शिल्पाला राज्य पुरस्कार
By Admin | Updated: March 23, 2017 01:12 IST2017-03-23T01:12:36+5:302017-03-23T01:12:36+5:30
महाराष्ट्र शासनाच्यावतीने मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आलेल्या ५७ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात

आशीष साळवीच्या शिल्पाला राज्य पुरस्कार
वाडा : महाराष्ट्र शासनाच्यावतीने मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आलेल्या ५७ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात येथील आशिष साळवी याने साकारलेल्या शिल्पाला राज्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
७ मार्च ते १३ मार्च दरम्यान हे कला प्रदर्शन भरविण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे उपनेते व खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते त्याला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रदर्शनाला उच्च व तंत्रशिक्षण, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली.
आशिषने १२ वी पर्यंतचे शिक्षण पी. जे. हायस्कूलच्या कला शाखेतून घेतले. नंतर शिल्पकलेच्या पदवी शिक्षणासाठी जे. जे. स्कूल आॅफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला. पदवी शिक्षणाच्या दरम्यान कॉलेजच्यावतीने घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये चारही वर्ष त्याने पुरस्कार मिळविले आहेत. पदवी घेतल्यानंतर इंदौर, मुंबई, राजस्थान येथे झालेल्या स्पर्धांमध्ये त्याला पारितोषिके तर मिळालीच पण एम.टी.डी.सी. च्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत द्वितीय तर व्यावसायिक प्रकारच्या तीनही स्पर्धांमध्ये त्याने प्रथम पारितोषिक मिळविले आहे. त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्याने या शहराची शान वाढविली आहे. (वार्ताहर)