वसई-पेण मेमू शटलच्या श्रेयावरून सेना भाजपात जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 06:02 IST2018-11-13T06:02:24+5:302018-11-13T06:02:46+5:30
वसई रोड स्थानक: शिवसैनिकांचा जल्लोष आणि बॅनरबाजी

वसई-पेण मेमू शटलच्या श्रेयावरून सेना भाजपात जुंपली
वसई : वसई-पेण मेमू शटलचे आज वसईरोड रेल्वे स्थानकात ढोल-ताशाच्या गजरात आज शिवसेनेकडून जोरदार स्वागत करण्यात आले. तिच्या श्रेयावरून सेनेत आणि भाजपामध्ये कलगीतुरा रंगला आहे. ही गाडी आज सोमवारी या मेमूची वेळ संध्याकाळी ५.२५ ची होती. पेण वरून ही गाडी वसई रोड रेल्वे स्थानकावर संध्याकाळी आल्यानंतर शिवसेना नवघर पूर्व शहर शाखेच्यावतीने शिवसैनिकांकडून तिचे जोरदार स्वागत करण्यात आले.
गाडीला हार-फुलाने सजविण्यात आले होते. यावेळी मोटरमनचे शिवसेना वसई तालुकाप्रमुख प्रविण म्हाप्रळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शहर प्रमुख राजाराम बाबर, विधानसभा संघटक विनायक निकम, उपतालुकाप्रमुख सुभाष विश्वासराव, उपशहर प्रमुख संजय गुरव, सुधाकर रेडकर, विश्वनाथ मातोंडकर, विभागप्रमुख शशीभूषण शर्मा, विभागप्रमूख जयराम राणे, शाखाप्रमुख अशोक सुळे, उपशाखाप्रमुख मनोज चौधरी, प्रमोद प्रभू, संजय उतेकर उपस्थीत होते. गाडीमुळे प्रवाशांची मोठी सोय होणार असल्याचे प्रवाशांनी सांगितले .
रेल्वेमंत्री आमचा म्हणून श्रेयही आमचे?
च्शिवसेनेचे खासदार अनंत गीते यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ही गाडी सुरु झाल्याचा दावा सेनेने केला. तसे फ्लेक्सही गाडीला लावले.
च्तर रेल्वे मंत्री आमचा त्यामुळे ही गाडी सुरू होण्याचे श्रेयही आमचे असा दावा भाजपने केला. त्यामुळे हा वाद चांगलाच रंगला त्याची चर्चाही महानगरात सुरु होती.