शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वसई विरार महानगरपालिकेच्या पहिल्या महासभेत स्थायी समिती सभापती व विरोधी पक्ष नेत्याची नेमणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 20:42 IST

याच सूत्रानुसार भाजपचे ६ सदस्य या समितीत जाणार होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- वसई विरार मनपाच्या निवडणुकीच्या ३५ दिवसानंतर पहिली महासभा घेण्यात आली. या महासभेत स्थायी समिती सभापती, १६ सदस्य व विरोधी पक्ष नेत्याची नेमणूक करण्यात आल्यानंतर तहकूब करण्यात आली. पहिलीच महासभा अनधिकृत बांधकामे व इतर प्रश्नावर वादळी होणार असे वाटत असताना प्रश्न उत्तर न होता दीड तासांत संपविण्यात आली. वसई विरार मनपाच्या निवडणुकीत बविआचे काँगेसच्या एका उमेदवारासह ७१ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे पक्षीय संख्याबळानुसार बविआला स्थायी समितीमध्ये १० सदस्यांना पाठविण्याची संधी मिळाली होती. तर याच सूत्रानुसार भाजपचे ६ सदस्य या समितीत जाणार होते.

स्थायी समिती सभापती व सदस्यांची नेमणूक

वसई विरार मनपाच्या स्थायी समितीच्या सभापती प्रफुल्ल साने यांची नेमणूक करण्यात आली. तर बविआकडून प्रवीण शेट्टी, नरेंद्र पाटील, लॉरेल डायस, पंकज पाटील, रंजना थालेकर, आलमगीर डायर, प्रफुल्ल पाटील, सुनील पाटील, चंद्रशेखर धुरी आणि भाजपकडून प्रज्ञा पाटील, महेश सरवणकर, दर्शना त्रिपाठी, निलेश चौधरी, जितेंद्र पाटील, अभय कक्कड या १६ सदस्यांची नेमणूक करून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.

विरोधी पक्ष नेते म्हणून मनोज पाटील यांची नियुक्ती

मनपाच्या ११५ नगरसेवकांपैकी ४३ नगरसेवक भाजपचे निवडून आल्याने विरोधी पद भाजपला मिळणार होते. पण कोण होणार याकडे वसईकरांचे लक्ष लागून होते. शुक्रवारी महासभेत भाजपचे मनोज पाटील यांची विरोधी पक्ष नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महापौर आहे अजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपीस यांनी मनोज पाटील यांची विरोधी पक्षनेते नेमणूक झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

गटनेत्यासाठी कार्यालय न दिल्याने नगरसेवकांचा राडा 

भाजप गटनेते अशोक शेळके यांना मनपा मुख्यालयात कार्यालय न उपलब्ध केल्याने भाजपाच्या ४३ नगरसेवकांनी आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या दालनात शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास राडा घालून अंदाजे अर्धा तास जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून बोळींज पोलिसही घटनास्थळी पोहचले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Vasai Virar Municipal Corporation: Committee Heads & Opposition Leader Appointed

Web Summary : Vasai Virar Municipal Corporation's first general meeting appointed committee heads and the opposition leader. Praful Sane is the Committee Chairman, and Manoj Patil is the Leader of the Opposition. BJP members protested the lack of an office for their group leader.
टॅग्स :Vasai Virar Municipal Corporation Electionवसई विरार महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Vasai Virarवसई विरार