...आणि सर्व्हेअरला झाली पळता भुई थोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 12:03 AM2019-10-13T00:03:39+5:302019-10-13T00:04:00+5:30

बोर्डीतील गावदेवी वस्तीत शुक्र वार, ११ आॅक्टोबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास एका गाडीतून आलेल्या सहा-सात व्यक्तींनी सर्वेक्षण सुरू केले.

... and the serveyar got a bit of an escape | ...आणि सर्व्हेअरला झाली पळता भुई थोडी

...आणि सर्व्हेअरला झाली पळता भुई थोडी

Next

- अनिरुद्ध पाटील 
लोकमत न्यूज नेटवर्क
डहाणू/बोर्डी : शासनातर्फे विविध उपक्रमाबाबत सर्वेक्षण सुरू असल्याचे सांगून खेडेगावात घरोघरी जाऊन काही तरुण कुटुंबियांची महत्त्वाची गोपनीय माहिती संकलित करतात. त्यानंतर त्याचा दुरुपयोग करून नागरिकांना गंडा घालतात, असा व्हॉट्सअपवर आलेला एक संदेश वाचून सतर्क झालेल्या बोर्डीतील एका गृहिणीने सर्व्हेअरचीच उलटतपासणी करून पोलिसांची भीती दाखवताच त्यांनी पलायन केले.


बोर्डीतील गावदेवी वस्तीत शुक्र वार, ११ आॅक्टोबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास एका गाडीतून आलेल्या सहा-सात व्यक्तींनी सर्वेक्षण सुरू केले. त्यापैकी एकजण भामिनी सावे यांच्या घरी गेला. घरातील ज्येष्ठ व्यक्ती म्हणून त्यांच्या सासऱ्यांकडे तो कुटुंबीयांची चौकशी करू लागला.
दरम्यान, गृहिणी असलेल्या भामिनी यांनी सकाळीच व्हॉट्सअप ग्रुपद्वारे, सर्व्हेच्या नावाखाली गृहभेट देऊन फसवणूक करणाºया टोळी विषयीचा संदेश वाचला होता. त्यामुळे सतर्क झालेल्या सावे यांनी त्याची उलटतपासणी करण्यास सुरुवात केल्याने तो गांगरला. शिवाय त्यांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचा विचार बोलून दाखवताच त्याला पळता भुई थोडी झाली.


या वस्तीत गेलेल्या अन्य साथीदारांना त्यांनी बोलावून तेथून पळ काढला. तर भामिनी यांनी याच वस्तीतील वृषाली सावे यांना फोनद्वारे घडला प्रकार सांगितला. त्यांनीही प्रसंगावधान राखून तत्काळ घोलवड पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना माहिती दिली. शिवाय व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून घटनाक्र म सांगणारा सतर्कतेचा मेसेज पाठविला.
दरम्यान, अकराच्या सुमारास सर्व्हेअरची ही टीम लगतच्या चिखले गावात आली. येथे एका ग्रामस्थांच्या घरी ते गेल्यावर त्याने सर्व्हेअरचे ओळखपत्र आणि व्हिझिटिंग कार्डचे मोबाईल फोनद्वारे फोटो काढले. शिवाय माहिती देण्यास नकार दिला. त्यानंतर साडेअकरच्या सुमारास त्यांनी व्हॉटस्अप उघडल्यावर बोर्डीतील महिलेने पाठवलेला संदेश वाचला.


असा अनुभव आपल्याला आल्याचा संदेश आणि घेतलेले फोटो त्यांनीही व्हॉटस्अप ग्रुपवर टाकले. मात्र, या सगळ्याचा फायदा या घटनेची चौकशी करणाºया घोलवड पोलिसांना झाला. त्यामुळेच तासाभरात या सर्व्हेअर टीमपर्यंत त्यांना पोहोचता आले.


व्हॉटसअ‍ॅप वादळावर पडला पडदा
एका मीडिया हाऊससाठी हे काम करीत असल्याचे या सर्व्हेअरनी चौकशीत सांगितल्याची माहिती प्रभारी अधिकारी सोनावणे यांनी दिली. त्यानंतरच या व्हॉटस्अप वादळावर पडदा पडला. मात्र, तोवर या संदेशाने सर्वत्र बºयापैकी खळबळ उडवून दिली होती. या गृहिणीच्या जागरुकतेमुळे जरी गोंधळ उडाला असला तरी यामुळे सोशल मीडियावरील संदेश हे किती गंभीरपणे घेतले जातात, हे देखल लक्षात आले.

Web Title: ... and the serveyar got a bit of an escape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.