नशामुक्तीचा ‘आयना’

By Admin | Updated: August 15, 2014 01:37 IST2014-08-15T01:36:11+5:302014-08-15T01:37:50+5:30

नशामुक्तीचे अभियान राष्ट्रीय स्तरावर पोचवण्यासाठी काम करणाऱ्या ४० संस्थांनी एकत्रित येत आॅल इंडिया नशामुक्ती अभियान (आयना)ची स्थापना केली आहे

Anaa's Recovery | नशामुक्तीचा ‘आयना’

नशामुक्तीचा ‘आयना’

मुंबई : नशामुक्तीचे अभियान राष्ट्रीय स्तरावर पोचवण्यासाठी काम करणाऱ्या ४० संस्थांनी एकत्रित येत आॅल इंडिया नशामुक्ती अभियान (आयना)ची स्थापना केली आहे. त्यात राज्य शासनाचे नशाबंदी मंडळ, मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ आणि अन्य महत्त्वाच्या संस्था आणि संघटनांचा समावेश आहे.
कृपा फाउंडेशनचे अध्यक्ष फादर जोजप एच. परेरा यांनी या अभियानाचे उद्घाटन करताना राष्ट्रीय स्तरावर हे अभियान यशस्वी करण्यासाठी संपूर्ण योगदान देण्याचे आश्वासन दिले. शिवाय अभियानाला आपला पाठिंबा दर्शवला. ते म्हणाले, नशामुक्ती करीत असताना त्याचा पुरवठाही बंद करणे आवश्यक आहे. कारण नशाबंदी आणि पुरवठा बंदी या दोन गोष्टींचा ताळमेळ साधल्यास राज्य आणि देश नशामुक्त होण्यास मदत होईल. आज तरुण पिढी दारू आणि तंबाखूजन्य पदार्थांशिवाय जुगार, पोर्नोग्राफी, इंटरनेट, सेक्स अशा विविध व्यसनांच्या अधीन होत आहे. या व्यसनांपासून त्यांची मुक्तता करण्यासाठी विविध संस्थाही काम करीत आहेत. मात्र वेगवेगळ््या पातळ्यांवर काम केल्याने त्यांचा म्हणावा तितका परिणाम होत नाही.
‘आयना’च्या निमित्ताने विविध स्तरांवर समुपदेशन, नशामुक्ती, पुनर्वसन अशी कामे करणाऱ्या संस्था एकत्र आल्या आहेत. त्यामुळे व्यसनांविरोधातील ही मोहीम अधिक परिणामकारक ठरेल, असे मत परेरा यांनी व्यक्त केले. गेट वे आॅफ इंडिया परिसरात नो स्मोकिंगचे फलक लावून या अभियानाची सुरुवात करणार असल्याचे नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, गेट वे आॅफ इंडियाचा परिसर नो स्मोकिंग झोन असतानाही पालिकेने तशी सूचना देणारा एकही फलक या ठिकाणी लावलेला नाही. त्यासाठी लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या ठिकाणी फलक लावण्याचा कार्यक्रम आयोजित केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)

Web Title: Anaa's Recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.