प्रलंबित मागण्यांबाबत चक्काजामचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 10:56 PM2019-09-05T22:56:47+5:302019-09-05T22:56:59+5:30

रविवारपर्यंतची मुदत : परिवहन मजदूर युनियनचे व्यवस्थापनाला पत्र

Alert warning of pending demands | प्रलंबित मागण्यांबाबत चक्काजामचा इशारा

प्रलंबित मागण्यांबाबत चक्काजामचा इशारा

Next

कल्याण : वेतनवाढ आणि रखडलेली पदोन्नती यांसह अन्य प्रलंबित मागण्यांसंदर्भात केडीएमटी उपक्रमातील कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन मजदूर युनियनने चक्काजाम आंदोलनाचा इशारा व्यवस्थापनाला दिला आहे. रविवारपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास सोमवारपासून कामबंद आंदोलन छेडण्यात येईल, असे पत्र युनियनतर्फे देण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत वेळोवेळी युनियनने पत्रव्यवहार केला आहे. बैठका होऊन चर्चाही करण्यात आल्या, पण अद्याप कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्याने कामबंद आंदोलनाचा पवित्रा युनियनतर्फे घेण्यात आला आहे. प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला केडीएमसीच्या कर्मचाºयांप्रमाणे केडीएमटीच्या कर्मचाºयांनाही वेतन मिळावे, पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगापोटी मिळणारी थकबाकी कर्मचाºयांना एकरकमी देण्यात यावी, १८ टक्के महागाईभत्ता त्वरित लागू करण्यात यावा, पगारातून होणारी कपात पीएफ, एलआयसी, कर्मचारी पतपेढी, गृहकर्ज रक्कम अनेक महिन्यांपासून वेतनातून कपात केलेली असून व्यवस्थापनाने ती भरलेली नाही. वेळेवर वेतन होत नसल्यामुळे अनेक अडचणींना कर्मचाºयांना तोंड द्यावे लागत आहे. २० वर्षांपासून रखडलेली पदोन्नती सेवा ज्येष्ठतेनुसार देण्यात यावी, केडीएमसीला राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे ज्या वेळेस सातवा वेतन आयोग लागू होईल, त्याच वेळेस परिवहन उपक्रमाच्या कर्मचाºयांनाही लागू व्हावा आदी मागण्या
युनियनच्या आहेत.

परिवहनची पूर्ण जबाबदारी घ्या! : नवी मुंबई, ठाणे, मुंबई महापालिका परिवहन विभागाची पूर्ण जबाबदारी घेऊ शकते तर केडीएमसीनेही केडीएमटी उपक्रमाची जबाबदारी का घेऊ नये? उपक्रमाची पूर्ण जबाबदारी घेऊ न परिवहन सेवा सक्षम करावी, याकडेही युनियनने लक्ष वेधले आहे. या मागण्यांबाबत योग्य तो निर्णय घेऊ न परिवहन कर्मचाºयांना न्याय द्यावा, अन्यथा सोमवारी दुपारी २ वाजल्यापासून कामबंद आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष अरविंद मोरे यांनी दिली.

Web Title: Alert warning of pending demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.