प्रकल्पग्रस्तांचे उपोषण आश्वासन मिळताच मागे

By Admin | Updated: January 30, 2017 01:24 IST2017-01-30T01:24:33+5:302017-01-30T01:24:33+5:30

या तालुक्यातील शेतकरी आदिवासी विकास संघटनेचे सदस्य व खडखड डोमीहिरा धरण प्रकल्पग्रस्त बुधवारी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते.

After the fasting of project affected people get assurances | प्रकल्पग्रस्तांचे उपोषण आश्वासन मिळताच मागे

प्रकल्पग्रस्तांचे उपोषण आश्वासन मिळताच मागे

जव्हार : या तालुक्यातील शेतकरी आदिवासी विकास संघटनेचे सदस्य व खडखड डोमीहिरा धरण प्रकल्पग्रस्त बुधवारी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. परंतु अप्पर जिल्हाधिकरी संदिप देशमुख यांनी सर्व अधिकाऱ्यांसमवेत उपोषणकर्त्यांची बैठक घेऊन सर्व मागण्या मान्य करून त्वरीत कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
यामध्ये नगर पालिकेने बनविलेल्या निकृष्ट रस्त्यांचे तांत्रिक लेखा परीक्षण करणे, रस्त्यांची निकृष्टे डागडुजी करणाऱ्या ठेकेदारासहीत दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे माफीया ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणे तसेच अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या तालुक्यांपुर्ते अधिकार देणे, पालघरला नेलेली पुर्नवसन विभागासाहित सर्व कार्यालये पुन्हा जव्हारला आणणे व आदेश नसतांनाही बंद करण्यात आलेला लोकशाही दिन पुन्हा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करणे. जव्हार मर्चट पतसंस्थेत झालेल्या सोनेतारण प्रकरणी दोषींवर कारवाई करणे. संदिप देशमुख यांनी मागण्यांबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरून मागण्या मान्य केल्या व कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यामुळे बोजा प्रकरणातील पीडीतांनी संघटनेचे अध्यक्ष अल्ताफ शेख यांचे आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: After the fasting of project affected people get assurances