शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपीला अटक, ४ गुन्हांची उकल; वसई पोलिसांची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 13:58 IST

गिरीज तलावाजवळील भंडारी सामाजिक विश्वस्त संस्थेच्या हनुमान मंदिरात ८ ऑक्टोबरला रात्री लाकडी दरवाज्याचा कडी कोंडा तोडुन मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करुन गाभाऱ्यातील दानपेटी चोरट्यांनी फोडून चार हजार पाचशे रुपयाची रक्कम चोरून नेली होती.

मंगेश कराळे -

नालासोपारा :- मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या आरोपीला वसईच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून पोलिसांनी ४ गुन्ह्यांची उकल करून चोरी करण्यासाठी वापरलेली रिक्षा पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी शनिवारी दिली आहे.

गिरीज तलावाजवळील भंडारी सामाजिक विश्वस्त संस्थेच्या हनुमान मंदिरात ८ ऑक्टोबरला रात्री लाकडी दरवाज्याचा कडी कोंडा तोडुन मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करुन गाभाऱ्यातील दानपेटी चोरट्यांनी फोडून चार हजार पाचशे रुपयाची रक्कम चोरून नेली होती. या चोरी प्रकरणी आशिष राऊत यांनी वस‌ई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. वसई पोलीस ठाणे हद्दिमध्ये मागील काही दिवसामध्ये घरफोडी व चोरीच्या गुन्हयामधील वाढत्या प्रमाणामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार यांचे दोन पथके तयार केली. 

सदर मंदीरातील तसेच घटनास्थळाचे आसपासचे सीसीटीव्ही चेक केल्यावर एक इसम हा स्वत:च्या तोंडाला कपडयाच्या सहाय्याने बांधुन डोक्यावर टोपी घालुन आपली ओळख लपवुन चोरी करण्याकरीता आला असल्याचे दिसुन आले. तसेच मंदीराबाहेरील सीसीटीव्ही चेक केल्यावर हा एका रिक्षामध्ये बसुन जात असल्याचे दिसुन आले. सदर रिक्षाबाबात चौकशी केल्यावर ती रिक्षा ही वालीव येथुन चोरी झाल्याची माहिती मिळाली. त्यावेळी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या दोन टिम तयार करुन एक टिम घटनास्थळ ठिकाणी व दुसरी टिम रिक्षा चोरीच्या घटनास्थळी वालीव येथे जावुन सीसीटीव्हीच्या व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हातील आरोपीचे नाव निष्पन्न करुन आरोपी शाबीर ऊर्फ फतेह मुर्तजाअली शेख (२६) याला धानिवबाग येथुन सापळा रचुन ताब्यात घेतले. आरोपीकडे चौकशी केल्यावर गुन्हातील त्याचा सहभाग निष्पन्न झाल्याने अटक करण्यात आली आहे. त्याचेकडे अधिक तपास केल्यावर आरोपीने गुन्हयात वापरेलेली रिक्षा वालीव येथून चोरली असुन त्याने वसई व माणिकपुर हद्दीमध्ये मंदीर व चर्चमध्ये अशाच प्रकारे दानपेटीतुन पैसे चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहेे. आरोपीकडुन ५० हजार रूपये किंमतीची रिक्षा तसेच मंदीर व चर्चमधून चोरी केलेली ४ हजार ९६ रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पौणिमा चौगुली-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बढे यांचे मार्गदर्शनाखाली वसईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित आंधळे, पोलीस निरिक्षक (गुन्हे) अब्दुलहक देसाई, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल पवार, पोलीस हवालदार सुनिल मलावकर, मिलींद घरत, सुर्यकांत मुंढे, अक्षय नांदगावकर, सौरभ दराडे, प्रशांत आहेर यांनी केलेली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसTempleमंदिर