हत्या करून पळालेले आरोपी निघाले चोरटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 00:04 IST2018-10-19T00:04:56+5:302018-10-19T00:04:59+5:30
दीड किलोचे सोने हस्तगत : नारायणलाल सेवक यांच्या हत्या प्रकरणाला फुटले फाटे

हत्या करून पळालेले आरोपी निघाले चोरटे
वसई : वसईत राहणाऱ्या नारायणलाल चंपालाल सेवक (२९ ) यांची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह वाडा- मनोर भागाच्या निर्जनस्थळी एका कारमधून नेणारे खुनी चार दिवसापूर्वी वाघोटा टोल- नाक्यावर पालघर जिल्हा गुन्हे प्रतिबंधक पथकातील नाकाबंदीवर असणाºया पोलिसांच्या जाळ्यात अडकले होते,
पोलिसांनी केलेल्या आरोपींच्या सखोल चौकशीत हे तिघे आरोपी दुसरे- तिसरे कोणी नाही तर चक्क अट्टलचोर असल्याचे निष्पन्न झाले आहे. या आरोपीकडून पोलिसांनी सुमारे दिड किलो सोने हस्तगत केले आहे. दरम्यान, या अट्टल चोरट्यांनी केलेली व्यापाराची हत्या व विविध ठिकाणाहून चोरी केलेले सोने यांची माहिती देण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनखाली माणिकपूर पोलीस ठाण्यात बुधवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी माहिती देताना पोलीस निरीक्षक बांदेकर यांनी सांगितले की, वसई रोड स्थित नारायणलाला सेवक यांची रविवारी हत्या करून तिघे आरोपी वाड्याच्या दिशेने निघाले त्यावेळी जिल्हा पोलीस शाखेच्या पथकाने त्यांना पकडले, यावेळी आरोपींची चौकशी केल्यावर मयत व्यापारी नारायणलाल सेवक हा आरोपींना ब्लॅकमेल करीत होता त्यामुळे त्यास ठार मारल्याची कबुली आरोपीनी पालघर पोलसांना दिली होती. परिणामी ही हत्या माणिकपूर पोलीस ठाणे हद्दीत झाल्याने शेवटी हा तपास जिल्हा पोलीस अधीक्षकांनी माणिकपूर पोलिसांकडे वर्ग केला होता. त्यांनतर या तपासाची सूत्रे माणिकपूर पोलिसांनी जोमाने फिरवताना अचानक वडाळा टी टी येथे दागिन्यांच्या चोरी प्रकरणात दाखल असलेल्या गुन्हयाशी आरोपी क्र. १ याचा संबंध असल्याचे समजले, तर दुसºया आरोपीने तिसºया आरोपीच्या मदतीने सर्व दागिने लपवल्याचे तपासात निष्पन्न झाले.