शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील हत्येप्रकरणी आरोपी तृतीय पंथीयाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 18:44 IST

पैशांच्या वादातून ही हत्या एका तृतीयपंथीयाने केल्याचे उघड झाले आहे.

नालासोपारा (मंगेश कराळे) :- मुंबई अहमदाबाद महामार्गावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी तृतीय पंथीय आरोपीला शुक्रवारी संध्याकाळी अटक केले आहे. विशेष म्हणजे मृतदेहाची ओळख पटण्यापूर्वीच गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने २४ तासांच्या आत जलद कामगिरी करत आरोपी गजाआड केला आहे. पैशांच्या वादातून ही हत्या एका तृतीयपंथीयाने केल्याचे उघड झाले आहे.

मुंबई अहमदाबाद महामार्गाजवळ असलेल्या सातिवली खिंडीत गुरूवारी दुपारी झुडपात एक अर्धनग्न अवस्थेत ३० ते ३५ वयोगटातील एका इसमाचा मृतदेह आढळला होता. दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली होती.  त्याची ओळख पटेल अशी एकही वस्तू घटनास्थळी नव्हती. मयताची ओळख पटविण्याचे त्याचबरोबर मारेकऱ्याला शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. मात्र मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अवघ्या २४ तासांच्या आत आरोपी रुपा शेख नावाच्या तृतीयपंथीयाला या हत्या प्रकरणात अटक केली आहे. हत्या झालेल्याचे नाव महेंद्र कुमार दुबे असून तो चिंचोटी परिसरात राहत होता.

एका साडीमुळे मिळाला सुगावा

घटनास्थळावर सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केल्यावर एक साडी आणि वापरलेले काही कॉण्डम आढळले. रात्रीच्या वेळी तृतीयपंथीय या परिसरात असतात आणि मयत तृतियपंथीयाकडे आलेला ग्राहक असू शकतो असा कयास पोलिसांनी लावला. रात्रीपासून पोलिसांनी शहरातील सर्व तृतियपंथीयांच्या वस्त्या, अड्डे यावर धाडी घातल्या. रुपा शेख नावाची तृतीयपंथीय या परिसरात व्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. मात्र ती कबूल होत नव्हती. दरम्यान, शुक्रवारी दुपारी मयताच्या शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांना मिळाला. त्यात हत्या ४८ तासांपूर्वी झाल्याचे आढळून आले. ४८ तासांपूर्वी रुपा शेख कुठे होती त्याचे मोबाईल लोकेशन पोलिसांनी काढले. त्यावेळी रुपा शेख त्याच सातिवली खिंडीत असल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी आढळलेली साडी तिचीच असल्याचेही निष्पन्न झाले.

घटनास्थळावरील साडी, हत्येच्या वेळी आरोपी घटनास्थळी असल्याचा मिळालेला तांत्रिक पुरावा या आधारे रुपा शेख या तृतीयपंथियानेच ही हत्या केल्याचे निष्पन्न झाल्याने तिला अटक केली आहे. - शाहूराज रणावरे, (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट २)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस