शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

माजी आमदार विवेक पंडित यांच्या गाडीला वसईत अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 2:21 PM

किरकोळ दुखापत वगळता माजी आमदार सुखरूप; मात्र गाडीचे मोठे नुकसान

आशिष राणे 

वसई - श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्य आढावा समितीचे अध्यक्ष माजी आम.विवेक भाऊ पंडित यांच्या गाडीला शुक्रवारी रात्री 9.20 मिनीटांनी अपघात झाला असल्याची घटना समोर आली आहे. नशीब बलवत्तर म्हणून माजी आम,विवेक पंडित या अपघातातून बाल बाल  बचावले आहेत, तर पंडित यांना किरकोळ दुखापत वगळता त्यांच्या  इन्व्होवा गाडीचे मात्र मोठं नुकसान झाले आहे. 

सविस्तर माहिती नुसार शुक्रवारी संध्याकाळी उशिरा 9.20 च्या सुमारास विवेक पंडित वसई महामार्गावर असलेल्या चिंचोटी परिसरातील बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम आटपून घोडबंदरकडे परतत असताना, त्यांच्या एम.एच 04 जे बी 8721 या इन्व्होवा गाडीला पाठी मागून भरधाव येणाऱ्या एका फॉर्चूनर गाडीने जोरदार धडक दिली. घोडबंदर पुलाच्या आधी असणाऱ्या इंडियन ऑईल पेट्रोलपंप जवळ हा अपघात घडला.

या अपघात विवेक पंडित यांना मुका मार लागला असून काही प्रमाणात किरकोळ दुखापत ही झाली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच यासंदर्भात पंडित यांच्या गाडीला अपघात झाल्याच्या घटनेबाबतीत चुकीच्या माहितीचा संदेश सोशल मिडियावर रात्रीपासूनच अफवा पसरवल्या जात होत्या. मात्र, मी सुखरूप आहे, त्यामुळे अन्य काही या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पंडित यांनी एका व्हिडीओ व संदेशाद्वारे केले आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका,या संदर्भात पंडित यांचे सहकारी प्रमोद पवार यांनी माजी आमदार विवेक भाऊ सुखरूप असल्याचे माध्यमाना सांगितले असून हा अपघात गाडीला मोठे नुकसान करणारा असला तरी विवेक पंडित त्यांच्या उसगाव याठिकाणी अगदी सुखरूप असून सुलतान भाई हे सहकारी पंडित यांसोबत होते, तेही सुखरूप आहेत. त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. हजारो दुखीतांचे अश्रू पुसणाऱ्या विवेक पंडितांना लोकांचे अनेक आशीर्वाद लाभल्याने ते या अपघातातून बाल बाल बचावल्याची प्रतिक्रिया प्रमोद पवार यांनी विवेक पंडित यांच्यावतीने दिली. सोबत विवेक पंडित यांनी मी सुखरूप असल्याचा व मला भेटायचे असेल तर उसगावच्या फार्म हाऊसवर यावे, असेही पंडित यांनी जारी केलेल्या व्हिडीओमध्ये म्हंटलं आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारAccidentअपघातMLAआमदार