टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2024 19:29 IST2024-03-04T19:29:33+5:302024-03-04T19:29:44+5:30
विरार पूर्वेकडील नवजीवननगर, साई श्रद्धा बिल्डिंगमध्ये तो वास्तव्याला होता.

टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
-मनोज तांबे
विरार : वसई-विरार शहरात अलीकडच्या काळात भरधाव टँकरच्या धडकेत मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. विरार पूर्वेकडील नारंगी बायपास रस्त्यावर सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान एका ३० वर्षीय तरुणाला टँकरने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. शैलेश कोंडगावकर असे या तरुणाचे नाव आहे.
विरार पूर्वेकडील नवजीवननगर, साई श्रद्धा बिल्डिंगमध्ये तो वास्तव्याला होता. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार शैलेश हा आपल्या बाईकवरून नारंगी गावाकडे जात होता. मात्र, मागून येऊन एका भरधाव टँकर चालकाने त्याला धडक दिली. या धडकेत तो खाली पडला आणि टँकर खाली चिरडल्या गेला. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. शैलेशच्या पश्चात आई, वडील आणि लहान बहीण असा परिवार आहे. शैलेश टूर ॲण्ड ट्रॅव्हलचा व्यवसाय करीत होता. त्यावर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू होता. वडील अनेक वर्षांपासून आजाराने ग्रस्त असल्यामुळे ते घरीच होते, अशी माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली. शैलेशच्या जाण्याने कोनगावकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर शैलेशच्या नातेवाइकांसह परिसरातील नागरिकांत संताप व्यक्त होऊ लागला होता. मात्र, पोलिसांनी नातेवाइकांनी समजूत काढत शव ताब्यात घेत शविच्छेदनासाठी पुढे पाठविले आहे. पोलिसांनी टँकर चालकाला ताब्यात घेतले आहे.