घरातील दागिने चोरून विक्री प्रकरणी मुलासह त्याच्या मैत्रिणीवर गुन्हा दाखल 

By धीरज परब | Updated: April 23, 2024 20:15 IST2024-04-23T19:15:37+5:302024-04-23T20:15:07+5:30

पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हस्कोटी हे तपास करत आहेत. 

A case has been registered against the boy along with his girlfriend in the case of stealing and selling jewelery from the house | घरातील दागिने चोरून विक्री प्रकरणी मुलासह त्याच्या मैत्रिणीवर गुन्हा दाखल 

घरातील दागिने चोरून विक्री प्रकरणी मुलासह त्याच्या मैत्रिणीवर गुन्हा दाखल 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मुलाने घरातले दागिने चोरून मैत्रिणीच्या मदतीने विकल्या प्रकरणी वडिलांच्या फिर्यादी वरून नवघर पोलिसांनी मुलासह त्याच्या मैत्रिणीवर गुन्हा दाखल केला आहे. भाईंदर पूर्वेच्या गोल्डन वेस्ट येथील सोनम हाईट्स मध्ये वकील असलेले भास्करदत्त देवीप्रसाद उपाध्याय राहतात. त्यांचा मुलगा प्रांजल उपाध्याय हा भाईंदर पूर्वेच्या केबिन क्रॉस रोड येथील पूजा नगर मध्ये राहतो.  

प्रांजल याने वडिलांच्या नकळत व त्यांच्या संमतीशिवाय घरातील सोन्याच्या बांगड्या, चैन ,अंगठ्या, कानातले झुमके-रिंग आदी १ लाख १६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने परस्पर घरातून चोरी केले. नंतर ते त्याने मैत्रीण पूजा तिवारी हिच्या मदतीने विकले.  सदर प्रकार लक्षात आल्यानंतर उपाध्याय यांच्या फिर्यादीवरून नवघर पोलिसांनी २१ एप्रिल रोजी मुलगा प्रांजल व मुलाची मैत्रीण पूजा या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हस्कोटी हे तपास करत आहेत. 

Web Title: A case has been registered against the boy along with his girlfriend in the case of stealing and selling jewelery from the house