पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ९० कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 00:38 IST2018-06-28T00:38:46+5:302018-06-28T00:38:48+5:30
यंदाच्या खरीप पीक कर्ज वाटपासाठी १८० कोटींचे उद्दिष्ट निश्चित केलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (टीडीसीसी) आता तालुकास्तरीय शेतकरी मेळावे २८ जून पासून सुरू करीत आहे

पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ९० कोटी
सुरेश लोखंडे
ठाणे : यंदाच्या खरीप पीक कर्ज वाटपासाठी १८० कोटींचे उद्दिष्ट निश्चित केलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (टीडीसीसी) आता तालुकास्तरीय शेतकरी मेळावे २८ जून पासून सुरू करीत आहे. ९ दिवस ठाणे व पालघर जिल्ह्यातील ठिकठिकाणी होणाºया या मेळाव्यांव्दारे शेतकºयांमध्ये जनजागृती करून त्यांना या योजनेचे त्वरीत लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले.
टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यासह उपाध्यक्ष भाऊ कुºहाडे सीईओं भगीरथ भोईर, बंँकेचे सर्व संचालक, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रांत, तहसीलदार, निबंधक, उपनिबंधक, तलाठी, कृषी विभागाचे अधिकारी शेतकरी मोठ्यासंख्येने उपस्थित राहणार असल्याचे सीईओ भोईर यांनी सांगितले. या शेतकरी मेळावा जनजागृतीद्वरे ठाणे व पालघर जिल्ह्यात प्रत्येकी ९० कोटींचे पीक कर्जाचे वाटप शेतकºयांना करणार असल्याचे भोईर यांनी सांगितले.
आजपर्यंत ठाणे जिल्ह्यातील शेतकºयांना ४३ कोटी २२ लाख म्हणजे ४८ टक्के तर पालघर जिल्ह्यातील शेतकºयांना ३३ टक्के म्हणजे ३० कोटी दोन लाखांचे पीक कर्ज वाटप झाल्याचे भोईर यांनी सांगितले.
किन्हवली येथील राईस मिल हाँल येथे गुरुवारी पहिला पीक कर्ज मार्गदर्शन शेतकरी मेळावा होणार आहे. २९ जूनला वसईच्या शिरसाड फाटा येथील जैन मंदिर व पालघरच्या काँग्रेस भवन सभागृहात तर ३० जून ला विक्र मगडचे औसरकर सभागृह व कासा येथील बँकेच्या सभागृहात हा मेळावा होणार आहे. यानंतर २ जुलैला मुरबाड बाजार समिती, ३ जुलैला भिवंडीच्या दुगाडफाटा येथील सत्संग हॉल, ४ ला जव्हार - मोखाड्यासाठी जव्हारच्या बँक शाखा सभागृहात, ६ ला कल्याणच्या नालिंदी गांव भिसोळे येथे तर ७ जुलैला तलासरीच्या आमगांव ग्रामपंचायतीमध्ये मेळावा आहे.