शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
2
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
3
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
4
Prithviraj Chavan : सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे; पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
5
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
6
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
7
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
8
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
9
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
10
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
11
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
12
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
13
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
14
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
15
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
16
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
17
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
18
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
20
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड

वसईमध्ये ७,२८६ रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 1:00 AM

जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती : जीवघेण्या आजारातून बरे झालेल्यांचा सकारात्मक संदेश

लोकमत न्यूज नेटवर्कविरार : वसई-विरार शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे, मात्र त्याच वेळी शहरातील ७ हजार २८६ रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात केल्यामुळे सकारात्मक संदेशही मिळाला आहे. जगण्याची इच्छाशक्ती असेल तर कोरोनावर सहज मात करता येते, हेच या बरे झालेल्या रुग्णांनी दाखवून दिले आहे.वसई-विरारमध्ये कोरोना-बाधितांचा वाढता आकडा पाहता स्थिती चिंताजनक आहे. त्यात मागील चार-पाच दिवसांत ३२ जणांचा मृत्यू झाल्याने नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. शनिवारी शहरात १८३, तर रविवारी १९९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. रविवारी रात्रीपर्यंतच्या आकडेवारीनुसार, एकूण रुग्णांची संख्या ११ हजार १९० वर पोहोचली आहे. त्याच वेळी आतापर्यंत एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २२७ इतकी झाली आहे, तर बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या सात हजार २८६ इतकी असून तीन हजार ६७७ रुग्ण उपचार घेत आहेत. यात उपचार घेणाऱ्यांपेक्षा बरे होणाºयांचे प्रमाण दुपटीपेक्षा जास्त असल्याने समाधानही व्यक्त होत आहे.दुसरीकडे वसई-विरार पालिकेला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मागील चार-पाच दिवसांत महापालिका हद्दीत ३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा सद्यस्थितीत ११ हजारांचा उंबरठा ओलांडून पुढे गेला आहे.महापालिका परिसरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा सव्वादोनशेच्या पुढे गेला आहे. यामुळे कोरोनाचा वाढता प्रभाव चिंताजनक असून महापालिका प्रशासन कोरोना नियंत्रणाच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्यात कमी पडत असल्याचे म्हटले जात आहे.दरम्यान, महापालिका परिसरात कोरोनाने शिरकाव केला तरी वसई तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रांना त्याची झळ बसली नव्हती, मात्र लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कोरोनाला थोपवून धरण्यात यश मिळवलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रांतही कोरोनाने शिरकाव केला आहे. ग्रामीण भागातील २७ ग्रामपंचायतींच्या हद्दीत आता बाधितांचा आकडा ५०० च्या पुढे गेला आहे. तसेच अद्यापपर्यंत ग्रामीण भागात १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.ग्रामीण भागात झपाट्याने संक्रमणपालघर : पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. पालघर तालुक्यातील रुग्णांनी एक हजार‘चा तर वसईच्या ग्रामीण भागातही कोरोनाबाधित रुग्णांनी ५०० चा टप्पा ओलांडला आहे. रविवारी दुपारपर्यंतच्या अहवालानुसार, पालघर तालुक्यामध्ये १०४३ रुग्ण, तर वसईच्या ग्रामीण भागात ५१२ जणांना कोरोनाने बाधित केल्याचे स्पष्ट झाले आहे. पालघर जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये डहाणू ४६२, जव्हार १७३, मोखाडा ४३, तलासरी ८९, विक्रमगड १३७, वाडा ३६७ रुग्ण आढळलेले आहेत. यामध्ये आढळलेल्या एकूण २८२६ रुग्णांपैकी २०८८ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे, तर ६९८ रुग्ण अद्यापही उपचार घेत आहेत.