शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

गुन्ह्यांची उकल उत्कृष्टपणे केल्याबद्दल ७ पोलीस अधिकाऱ्यांचे आयुक्तांकडून कौतुक 

By धीरज परब | Updated: April 11, 2023 18:14 IST

गुन्ह्यांची उकल उत्कृष्टपणे केल्याबद्दल ७ पोलीस अधिकाऱ्यांचे आयुक्तांकडून कौतुक करण्यात आले. 

मीरारोड : मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील ७ अधिकारी व त्यांच्या पथकाचा पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी मार्च महिन्यातील गुन्ह्याची उत्कृष्ट उकल केल्या बद्दल मीरारोड येथील पोलीस आयुक्तालयात पुरस्कार देऊन कौतुक केले. मीरारोड मध्ये बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री आले असता त्यांच्या कार्यक्रमात महिलांच्या गळ्यातील गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळ्या चोरून चोरटयांनी धुमाकूळ घातला होता. मीरा भाईंदर गुन्हे शाखा १ चे निरीक्षक अविराज कुराडे व मीरारोडचे निरीक्षक विजयसिंह बागल यांच्या पथकाने ८ जणांना अटक करून ४१९ ग्राम चे सोन्याचे दागिने हस्तगत केले  बद्दल गुन्ह्याची उत्कृष्ट उकलचे पहिले पारितोषिक कुराडे व बागल यांना देण्यात आले. 

अल्पवयीन दिव्यांग मुलीवर सतत बलात्कार करून तिला गरोदर ठेवल्या प्रकरणी तपास करून पीडित व घरातल्याना माहिती नसताना आरोपीला अटक केली म्हणून विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कांबळे यांना दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस दिले. मीरारोड मधील घरफोडी प्रकरणी १४ हुन अनेक गुन्हे दाखल असलेल्या सराईत घरफोड्यास पळून जाण्या आधी २३ लाखांच्या मुद्देमालासह पकडल्याने काशीमीराचे वरिष्ठ निरीक्षक संदीप कदम यांना तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.  म्यानमार मध्ये अडकलेल्या भाईंदरच्या तरुणाची सुटका करून मायदेशी आणल्याबद्दल भाईंदर भरोसा सेलच्या सहायक निरीक्षक तेजश्री शिंदे व पथकास स्पेशल रिवॉर्ड देऊन आयुक्तांनी सन्मानित केले. 

एका लहानश्या माहिती वरून एका नायजेरियन नागरिकास अटक करून ५८ लाख ७५ हजार किमतीचे कोकेन , एमडी आदी अमली पदार्थ हस्तगत केले  म्हणून तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शैलेंद्र नगरकर याना स्पेशल रिवॉर्ड १ देण्यात आला.  १६ वर्षां पूर्वी मीरारोड मधील एकाची हत्या करून त्याचा मृतदेह वसई हद्दीत महामार्गावर टाकणाऱ्या दोन आरोपीना उत्तराखंड मधून गुन्हे शाखा विरार कक्ष ३ चे प्रमोद बडाख आणि पथकाने अटक केली. त्या बद्दल  स्पेशल रिवॉर्ड २ ने सन्मानित केले गेले. वसई गुन्हे शाखा कक्ष २ चे निरीक्षक शाहूराज रनावरे व पथकाने १३ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणू चौघा आरोपीना अटक केल्या बद्दल  स्पेशल रिवॉर्ड ३ चे पारितोषिक देण्यात आले.  

 

टॅग्स :mira roadमीरा रोडPoliceपोलिस