शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

पालघरमध्ये ५० हजार बोगस मतदारांची नोंद , वाढीबाबत साशंकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 00:22 IST

निवडणुकीत बोगस मतदारांची नोंदणी करून निवडणुका जिंकण्याचे फॅड वाढत चालले असून लोकसभा निवडणुकीनंतर ५० हजार ८३३ मतदारांच्या झालेल्या वाढीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

- हितेन नाईकपालघर : निवडणुकीत बोगस मतदारांची नोंदणी करून निवडणुका जिंकण्याचे फॅड वाढत चालले असून लोकसभा निवडणुकीनंतर ५० हजार ८३३ मतदारांच्या झालेल्या वाढीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. अशा बोगस मतदारांच्या नोंदणीबाबत आक्षेप नोंदवूनही कारवाई होत नसल्याने पालघरमधील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.पालघर लोकसभा मतदारसंघात एका वर्षभरात १ लाख ५४ हजार नवीन मतदार वाढल्याची नोंद करण्यात आली असताना काही विधानसभा मतदारसंघात एका दिवसात सुमारे ३०० मतदारांची नोंद करण्याचा विक्रम नोंदविण्यात आला होता. त्यामुळे या विक्रमाबाबत साशंकता व्यक्त करीत बविआचे उमेदवार व माजी खासदार बळीराम जाधव यांनी नवीन मतदारांची नोंद कोणत्या विधानसभा क्षेत्रात झाली, त्यांनी कुठे मतदान केले याची माहिती मागत जोपर्यंत माहिती मिळत नाही तोपर्यंत मतमोजणीस स्थगिती द्यावी, अशी मागणी करीत जिल्हाधिकारी कार्यालयात उशिरापर्यंत ठाण मांडले होते.पालघर नगरपालिकेच्या २०१९ च्या निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात बोगस मतदानाची नोंद करण्यात आल्याचे पुरावे नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, गटनेते कैलास म्हात्रे, राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन पाटील आदींनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाºयासह निवडणूक आयोगाकडे दिले होते. मात्र त्याची दखल घेण्यात न आल्याने त्यांनी न्यायालयीन लढा देण्याचे ठरवत पालघर न्यायालयात याचिकाही दाखल केलेली आहे. या बोगस मतदार नोंदणी संदर्भातील तक्र ारी केल्यानंतर त्याची मागितलेली माहिती ही वेळीच दिली जात नाही.नालासोपारा मतदारसंघातही तब्बल १ लाखाहून अधिक मतदारांची नावे बोगसपणे नोंदण्यात आल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे. अंधेरी, ठाणे, मीरा-भार्इंदर आदी भागातील मतदारांची नावे बोगसरित्या नोंदविण्यात आली असून याचा छडा लावण्यासाठी माजी महापौर नारायण मानकर यांनी लेखी तक्र ारही केली आहे.बोगस मतदारनोंदणी करताना बोगस रेशनकार्डचा वापर ओळखपत्र म्हणून पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीत झाला असून पालघर तहसीलदार कार्यालयातील काही कर्मचारी व महा ई-सेवा केंद्रातील काहींचा यात सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस विभागाची टीम या प्रकरणाचा पर्दाफाश करण्याच्या अंतिम टप्प्यावर असताना त्यांना तालुका मतदारनोंदणी अधिकारी वर्गाकडून मागणी केलेली कागदपत्रे पुरवण्यास चालढकल केली जात असल्याचे समोर आले आहे. आम्हाला हवी असलेली कागदपत्रे आमच्या हाती मिळाल्यास या मागच्या षडयंत्राचा पर्दाफाश करणे आम्हाला सहज शक्य होईल, असे एका पोलीस अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला माहिती दिली.जिल्ह्यात मतदार नोंदणीची परंपरा आणि कार्यपद्धती विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झाल्याने १५ जुलै ते आॅगस्ट अखेरीपर्यंतच्या अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत ५० हजार ८३३ मतदारांची संख्या वाढली आहे.अशी झाली मतदारनोंदणीमतदान नोंदणी करताना दोन विशेष कार्यक्र म राबविण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर डहाणू विधानसभा मतदारसंघात ११२० मतदार, विक्र मगड मतदारसंघांमध्ये २१५२ मतदार, पालघर विधानसभा मतदारसंघांमध्ये २४२४ मतदार, बोईसर विधानसभा मतदारसंघांमध्ये १२ हजार ७२३ मतदार, नालासोपारा मतदारसंघामध्ये सर्वाधिक २४ हजार ७९७ मतदार तर वसई विधानसभा मतदारसंघांमध्ये ७६१७ अशा एकूण ५० हजार ८३३ मतदारांची नोंदणी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. 

टॅग्स :palgharपालघरElectionनिवडणूकVasai Virarवसई विरार