डहाणूच्या लोणीपाडा वस्तीतून 4.5 फूटी अजगराला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 15:21 IST2018-06-11T15:03:42+5:302018-06-11T15:21:05+5:30
डहाणूच्या लोणीपाडा या वस्तीतील कुशल जैस्वाल यांच्या घरानजिक सोमवार, 11जून रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास अजगर आढळला.

डहाणूच्या लोणीपाडा वस्तीतून 4.5 फूटी अजगराला पकडले
डहाणू - डहाणूच्या लोणीपाडा या वस्तीतील कुशल जैस्वाल यांच्या घरानजिक सोमवार, 11जून रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास अजगर आढळला. तो नर जातीचा असून त्याची लांबी 4.5 फूट आहे. स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर वाईल्डलाईफ कंन्झर्वेशन अँड एनिमल वेल्फेअर असोसियशनचे सदस्य प्रतीक व्हाहुरवाघ यांच्या नेतृत्वाखाली पारनाका येथील उपवन संरक्षक कार्यालयाच्या आवारातील कासव पुनर्वसन केंद्रात त्याला आणण्यात आले. त्याची तपासणी केल्यानंतर जंगलात सोडून देण्यात येणार आहे.दरम्यान भरवस्तीत दिवसाढवळ्या अजगराच्या वावरामुळे भीती तसेच आश्चर्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली.